चंद्रपूर/प्रतिनिधी:
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या 22 जानेवारी 2019 च्या आदेशान्वये थाई मांगूर या माशांची बिजनिर्मिती व मत्स्यसंवर्धन तसेच तलावात बिज संचयन करून संवधर्नावर बंदी घालण्यात आली आहे. हा मासा प्रतिबंधीत असून, जिल्ह्यात थाई मांगूर, आफ्रिकन, बॉयलर, हायब्रिड मांगूर या नावाने ओळखला जातो. थाई मांगूर हा मासा विदेशी प्रजातीचा असून मांस भक्षक आहे. या माशाचे संचयन स्थानिक नदी, तलावामध्ये झाल्यास हा मासा जलाशयातील स्थानिक माशांचे भक्षण करतो. त्यामुळे जलाशयातील जैविक घटकांवर त्याचा विपरित परिणाम होतो.
त्यामुळे प्रतिबंधित थाई मांगूर माशांची बिजनिर्मिती तसेच मत्स्यसंवर्धन करण्यात येऊ नये, असे आवाहन मत्स्यव्यवसायचे साहाय्यक आयुक्त जांभुळे यांनी केले आहे. थांई मांगूर प्रजातीच्या माशांची बिजनिर्मिती तसेच मत्स्यसंवर्धन करताना आढळल्यास असा मत्स्यसाठा नष्ट करण्याची कारवाई संबंधित विभागाद्वारे करण्यात येणार असल्याच्या सूचना सु. वा. जांभुळे यांनी दिल्या आहेत.