Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २५, २०१९

वरोरा नगरीत बाळू धानोरकर यांचे जंगी स्वागत


सोमवारी दुपारी माता महाकाली चा आशीर्वाद घेवून भरणार उमेदवारीपत्र


शिरीष उगे(वरोरा)

 'बाळू धानोरकर आगे बढो हम तुम्हारे साथ है, 'आला रे आला चंद्रपूरचा वाघ आला' आणि 'बाळूभाऊ धानोरकर जिंदाबाद' अशा गगनभेदी घोषणांनी लोकसभेचे चंद्रपूर - आर्णी मतदारक्षेत्रातले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे  संयुक्त उमेदवार बाळू धानोरकर यांचे आनंदचौक परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतीषबाजीने आनंदवन चौक परिसरात एकच जल्लोष निर्माण झाला होता.

         लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर चंद्रपूर- आर्णी  मतदारसंघात उमेदवार निवडीबद्दल दररोज बदलत्या राजकीय  घटनांक्रमामुळे उमेदवारां सोबतच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण स्थिती निर्माण झाली होती. मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेसच्या संपर्कात असलेल्या  बाळू धानोरकर यांना काँग्रेसचे तिकीट मिळणार असे सर्वांना वाटत असतानाच  नागपूरचे विशाल विलास मुत्तेमवार यांना चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी घोषित झाली. बाहेरचा  उमेदवार लादल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी होती. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भावना लक्षात घेता, व विशाल मुत्तेमवार यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार बदलला. उमेदवार बदलल्याने काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांची डावपेच आखणी  ही चालू होती म्हणून  बाळू धानोरकर काही दिवस दिल्लीलाच तळ ठोकून होते. त्यामुळे चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रात काँग्रेसची सीट बाळू धानोरकर यांना पक्की आहे असे गृहीत धरून चालत होते. शिवसेनेचा आमदार पदाचा राजीनामा दिला आणि यादरम्यान बाळू धानोरकर हे शिवबंधन तोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. सर्व दृष्टीने एक सक्षम उमेदवार  या नात्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल हे पक्के  असतानाच अचानक पक्षांकडून जाहीर झालेल्या लिस्ट मध्ये बाळू धानोरकर यांचे नावच नव्हते. त्याऐवजी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते विनायक बागडे यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसच्या लिस्ट मधून बाळू धानोरकरचे नाव वगळल्याने पूर्ण मतदारसंघ क्षेत्रात एकच खळबळ उडाली. राज्यात ही एकच ब्रेकिंग न्यूज गाजत होती. पक्षश्रेष्ठींनी आपला निर्णय बदलावा व शिवबंधन तोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले दमदार उमेदवार बाळू धानोरकर यांनाच या मतदारसंघातून तिकीट देण्यात यावे , यासाठी  काँग्रेसचे वरिष्ठ नेते आग्रही होते.  त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत्यांची मोलाची साथ लाभल्यामुळे तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवल्याने  सरतेशेवटी पक्षश्रेष्ठिंना आपला निर्णय बदलवावा लागला व अखेर शेवटच्या क्षणी बाळू धानोरकर यांना तिकीट जाहीर करण्यात आले. चंद्रपूर - आर्णी मतदारसंघात काँग्रेस कडून बाळू धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता. लोकसभेसाठी तिकीट मिळाल्यानंतर बाळू धानोरकर यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले व नंतर नागपूरला विजय वडेट्टीवार यांच्या निवासावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळू धानोरकर यांचे स्वागत केले. दिल्लीच्या यशस्वी  दौऱ्यातून परतलेल्या आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने जमलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व जनसामान्य नागरिक यांनी प्रचंड उत्साहात ठीक ठिकाणी त्यांचे स्वागत केले. आनंदवन चौक  परिसरात ढोल ताशाच्या गजरात 'बाळूभाऊ धानोरकर जिंदाबाद' अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती. अनेक महिलांनी  त्यांचे औक्षण केले.

      चंद्रपूर- आर्णी मतदारसंघात ज्या वेगाने राजकीय बाजी फिरली ते बघून राज्याच्या अनेक राजकीय अभ्यासकांवर चकित व्हायची वेळ आली आहे. आपल्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांची अलोट गर्दी बघता बाळू धानोरकर गदगद झाले. माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन सोमवारी चंद्रपूर येथे दुपारी दोनच्या सुमारास आपला नामांकन अर्ज भरण्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दिली .याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या मित्रपक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेला केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.