चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी आज चंद्रपुरात शेवटच्या दिवशी शक्तीप्रदर्शनात नामांकन दाखल करण्यात आले. भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ.) युतीचे उमेदवार हंसराज अहीर व काँग्रेस-राकॉ-पिरिपा युतीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामांकन दाखल केले. यावेळी समर्थकांची नामांकनसाठी चांगलीच गर्दी केली होती.
भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांची रॅली गिरनार चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आली. यावेळी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, वर्धेचे खासदार रामदास तडस, आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, आर्णीचे आ. राजू तोडसाम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेश सावंत,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, रमेश देशमुख, दिलीप कपूर, रिपाइं (आ.)चे जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर, माजी पालकमंत्री संजय देवतळे, यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र डांगे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, हरीश शर्मा, ब्रिजभुषण पाझारे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे , नितीन मत्ते, राजेश नायडू, रिपाइं (आ) जयप्रकाश कांबळे, राजू भगत, महापौर अंजली घोटेकर, यांच्यासह युती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जि.प., पं.स. सभापती व सदस्य, नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
तर काँग्रेस-राकाँचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी दुपारी १ वाजता आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सोमेश्वर मंदिर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत आपले शक्तीप्रदर्शन दाखवून दिले. या मिरवणुकीत आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, अॅड. बाबासाहेब वासाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर आणि राजुरा, बल्लारपूर, मूल, वणी, आर्णी व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.