चिमूर/रोहित रामटेके
दरवर्षीप्रमाणे यंदा ही मराठी तिथी च्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेनेच्या वतीने साजरी केली जात असून शिवसेना तालुका प्रमुख विलास डांगे यांच्या नेतृत्वात शिव जयंती साजरी करण्यात आली
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे चे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले. चिमूर कांपा मुख्य रस्त्यावरील हजारे पेट्रोल पंप पासून शिवजयंती मिरवणूक प्रारंभ करण्यात आली शहराच्या मुख्य मार्गाने मिरवणूक काढून पेट्रोल पंप जवळ विसर्जित करण्यात आली वाद्याच्या गजरात शिवसैनिक उत्साह नाचत व घोषणा देत लोकांचे लक्ष वेधून घेत होती दरम्यान आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी हुतात्मा स्मारक जवळ मिरवणुकीत सहभागी होत व शहीद बालाजी रायपूरकर चौकात जीप गट नेते डॉ सतीश वारजूकर सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले
मिरवणुकीत भजन दिंडी होते जयंती यशस्वी करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख विलास डांगे ,भाऊराव ठोंबरे, विनायक मुंगले, अनिल डगवार, सचिन खाडे रमेशकुमार भिलकर, कवडू गजभे संजय गभने नाना नंदनवार अशोक सावसाकडे डुकसे, वैभव डांगे यांनी परिश्रम घेत सहभागी होते.

