Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

दारू विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही

गडचिरोली/प्रतिनिधी:
We will not vote for the party supporting the Alcohol sellers | दारू विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही

 येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांना दारू वाटून त्यांची मते मिळविण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. धानोरा तालुक्यातही हा प्रकार नेहमीच चालतो. तालुक्याच्या सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त असते. मुरूमगाव येथील महिला हा प्रकार नेहमीच अनुभवतात. परंतु आता महिलांनी दारूविक्र ी बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.

यंदाही प्रचारासाठी गाव पातळीवर बैठका घेताना लोकांना दारूचे आमिष दाखिवण्याचा प्रकार घडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी मुरूमगाव येथील महिलांनी मंगळवारी बैठक घेऊन केलेला ठराव राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे मतदारांना दारूचे प्रलोभन देण्याला आळा बसू शकेल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.