वर्धा/प्रतिनिधी:
मागील 5 महिन्यांपासून सुरू होता कारभार
विविध आमिष देऊन नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात पैसे टाकून घेणाऱ्या ठगबाजांच्या टोळीतील दोन मुख्य आरोपींना वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले. या दोघांनी दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर सुरू करून त्याच कॉल सेंटरच्या माध्यमातून देशातील विविध भागातील नागरिकांना सुमारे २ कोटींनी गंडा घातला आहे. राहूल सुजनसिंग यादव (२२) रा. कन्नोज उत्तर प्रदेश व पंकज जगदीश राठोड (२८) रा. दिल्ली, असे अटकेतील आरोपींची नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६.३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिल्लीत बनावट कॉलसेंटरवर धाड-2आरोपी अटक 6,06,600 रू चा माल जप्त
दिल्ली येथील खोटे कॉल सेंटर उघड
संपुर्ण भारतात कॉल करीत होते 15 कॉलर्स.
लकी ड्राॅ व प्राॅडक्ट सेलींगच्या नावावर भरावयास लावायचे रक्कम
आतापावेतो 2 करोड रूपयांची उलाढाल
दिल्ली येथील बनावट कॉल सेंटरमध्ये सुमारे १५ जणांना दहा ते बारा हजार रुपये वेतनावर कामावर
पोलिसांनी बनावट कॉल सेंटरमधील मोबाईल, संगणक, राऊटर इतर साहित्य असा एकूण ६ लाख ३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, छाया तेलघोटे, कुलदीप टांकसाळे, कुणाल हिवसे, अनुप कावळे, जगदीश डफ, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, आनंद भस्मे, दिवाकर परिमल, मुकेश येल्ले यांनी केली.