Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते Rajkumar Barjatya यांचे निधन

राजश्री फिल्मचे संस्थापक आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडिल होत. त्यांच्या मागे पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे.


राजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली.  १९७२ साली आलेला पिया का घर, १९९४ मध्ये गाजलेला हम आपके है कौन, १९९९ चा हम साथ साथ है, असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिलेत. गत १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.