चंद्रपूर/प्रतिनिधी:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या सर्व बदल्या जिल्हांतर्गत आहेत.
पोलीस निरीक्षकांमध्ये दीपक गोतमारे यांची बदली आर्थिक गुन्हेशाखेतून बल्लारपूर पोलीस ठाण्यात केली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे दीपक खोब्रागडे यांच्याकडे दुर्गापूर पोलीस ठाण्याचा भार सोपविला आहे. तर दुर्गापूरचे हृदयनारयण यादव यांच्याकडे भद्रावती पोलीस ठाण्याचा भार सोपविला आहे. भद्रावतीचे बारीकराव मडावी यांच्यावर नियंत्रण कक्षाची जबाबदारी सोपविली आहे. नियंत्रण कक्षाचे विलास निकम यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याचा भार सोपविला आहे. बल्लारपूरचे गोपाल भारती यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे.
सात सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंदेवाहीचे सुमित खैरकार यांची बदली वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रामनगरचे एन. एस. रामटेके यांची सिंदेवाही ठाण्यात करण्यात आली आहे. ब्रह्मपुरीच्या वनमाला पारधी यांची बदली बल्लारपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भिसीचे मंगेश काळे यांची बदली वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेगावचे कृष्णकुमार तिवारी यांची बदली विरुर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चंद्रपूर गुन्हे शाखेचे सुधीर बोरकुटे यांची शेगाव ठाण्यात करण्यात आली आहे. ब्रह्मपुरीचे दिनेश झांमरे यांची बदली भिसी ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षकांमध्ये पाच बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये संतोष जाधव यांची बदली बल्लारपूरहून नागभीड येथे करण्यात आली आहे. जितेंद्र ठाकूर यांची बदली तळोधी येथून भद्रावती ठाण्यात करण्यात आली आहे. आनंदकुमार खंडारे यांची बदली जिवतीहून चंद्रपूर शहर ठाण्यात करण्यात आली आहे. अचलकुमार मलकापुरे यांची बदली नागभीड येथून बल्लारपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तर संजय भारती आरसीपी पथकातून राजुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे