Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

वीस वर्ष पत्रकारीता केलेल्या पत्रकारांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करा -सादिक खाटीक

खरसुंडी /आटपाडी दि .१७ ( प्रतिनिधी )* शहर,ग्रामीण भागात वीस वर्षे मानधनावर काम केलेल्या पत्रकाराना कसल्याही जाचक अटी न लावता प्रति महीना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केली आहे .               

  खरसुंडी येथील श्री . जोगेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात झालेल्या आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत ते बोलत होते . अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नागेश गायकवाड हे होते .                                 

    देशामध्ये पत्रकारांना सहा हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा करणारे मागास बिहार राज्य अग्रेसर ठरले आहे .वृतपत्रसृष्टी आणि पत्रकारीतेत अव्वल म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने सर्वप्रथम पेन्शन लागू करण्याचा निर्णय करावयास हवा होता .अधिस्विकृतीची शिक्षणाची मर्यादा दहावीपर्यत आणून वीस वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेल्या पत्रकारास तात्काळ अधिस्विकृती कार्ड दिले जावे , पत्रकारांच्या परिवारातल्या सर्वांनाच लाभ घेता येणारी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत नावे समाविष्ट करण्याची मुदत महिनाभर वाढवावी ., शासनाने आपल्या मार्फत पत्रकारांच्या परिवारातल्या सर्वांचे आयुष्यभराचे लाईफ इन्शुरन्स आणि अपघाती विमे उतरावेत अशीही मागणी त्यांनी केली .                                 यावेळी २८ वर्ष कार्यरत असलेल्या आटपाडी तालुका पत्रकार संघाच्या व्यवस्थापन कार्यात आमुलाग्र बदल करणे, नवे रूप आणणे , संघाच्या आर्थिक बळकटीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करणे, पत्रकारांचे आर्थीक नियोजन , प्रसंगानुरुप येणाऱ्या अडचणी , पत्रकार संघाला जागा , संघासाठी इमारत आणि पत्रकार निवासस्थान यावर चर्चा करणेत आली.                            स्वागत प्रास्तावीक माजी अध्यक्ष किशोर पुजारी यांनी केले , 

प्रारंभी काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हाल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहणेत आली . यावेळी चर्चेत उपाध्यक्ष सदाशीव पुकळे,सतिश भिंगे , किशोर पुजारी , नंदकुमार निचळ , , विक्रम भिसे , अध्यक्ष नागेश गायकवाड ,हामीद शेख, लक्ष्मण सरगर, गणेश जाधव, लतिफ मुलाणी , सुरेश मोकाशी , मनोज कांबळे, प्रशांत देशमुख , सदानंद कांबळे इत्यादींनी सहभाग घेतला. मोठया संख्येने पत्रकार या बैठकीस उपस्थित होते . शेवटी नागेश गायकवाड यांनी आभार मानले .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.