Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

आता असा असेल WhatsApp

WhatsApp Groups मुळे त्रस्त आहात? हे नवे फिचर करेल तुमची मदत


Who Can Add Me To Group' चा पर्याय दिसेल. यात तीन ऑप्शन्स असतील- Everyone, My Contacts आणि Nobody. तुम्ही यापैकी एकाची निवड करु शकता.  

आपल्यापैकी अनेकजण सातत्याने whatsapp चा वापर करत असतात. पण अनेकदा आपल्याला काही whatsapp ग्रुप्स कंटाळवाणे वाटतात किंवा काहींमध्ये सहभागी होण्याची देखील आपली इच्छा नसते. युजर्सचा whatsapp group बद्दलचा हा त्रास लक्षात घेऊनच इंस्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवे फिचर केले आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही whatsapp वरील नको असलेले ग्रुप टाळू शकता.


WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, मेसेजिंग अॅप नवनव्या सुधारणा करत आहे. नवे ग्रुप फिचर लवकरच आयओएस (ios) आणि अॅनरॉईड (Android) ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध होईल. हे फिचर अॅक्टीव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये काही बदल करावे लागतील.


सेटिंग मेन्यू मध्ये जा. त्यात Account> Privacy> Groups मध्ये जा. त्यात युजर्सला 'Who Can Add Me To Group' चा पर्याय दिसेल. यात तीन ऑप्शन्स असतील- Everyone, My Contacts आणि Nobody. तुम्ही यापैकी एकाची निवड करु शकता. लास्ट सीन, प्रोफाईल फोटो, अबाऊट आणि स्टेटस फिचरप्रमाणेच हे फिचर देखील काम करेल.


My Contacts हा पर्याय निवडल्यास जेव्हा कोणी तुम्हाला नव्या ग्रुपमध्ये अॅड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. जर युजर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये ऑटोमेटिक अॅड व्हाल. जर Nobody या पर्यायाचा वापर केल्यास 72 तासांत तुम्हाला इनव्हाईटचा रिप्लाय करावा लागेल. अन्यथा इनव्हाईट कॅन्सल होईल. Everyone हा पर्याय कमी युजर्सकडून वापरला जाईल. पण त्यामुळे कोणीही तुम्हाला whatsapp group मध्ये अॅड करु शकेल.


Kavyashilp Digital Media

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.