न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चंद्रपूर येथे 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
चंद्रपूर/प्रतिनिधी-
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द एज्युकेशन संस्थेचे सचिव जवळे सर, प्राचार्य भांडवलकर सर, पर्यवेक्षक ठावरी, पांढरकवडा शाखेचे प्राचार्य बंसुले, पालक सभेच्या उपाध्यक्षा जया रामटेके हे प्रामुख्याने उपस्थिती होते.
शाळेच्या वतीने इयत्ता10 वी व 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. हरीश ससनकर यांनी आपल्या चौफेर मार्गदर्शनातून मोबाईल चा वापर, आई वडिलांच्या सन्मान, विद्यार्थ्यांचे चार गुरू, उद्दिष्ट, चांगले नागरिक बनण्याची गरज, जीवनातील समाधान कशात आहे, आदर्श विद्यार्थी कसे बनता येईल, अभ्यासाचे तंत्र, ताणतनावातून मार्ग काढणे या विषयांतून विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी जीवनाचा मंत्र जागवला. प्रास्तविकात प्राचार्य भांडवलकर यांनी शाळेतील उप्रकम व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोई सुविधा सांगितल्या, शाळेची उच्च निकालाची परंपरा व त्यामुळे विद्यार्थी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शाळेत प्रवेश घेतात, शाळेतून शिकून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हावे असे विचार मांडले तर अध्यक्षीय भाषणात जवळे सरांनी विद्यार्थ्यांनी मोठ्यांच्या विचारांचे पालन करून आपले आचरण करावे व यशस्वी व्हावे असे आवाहन केले. यावेळी रोहित नेवारे, निकिता गायकवाड, सविता मुरकुटे, सोनिराम सीडाम, साहिला, विशेष, रोहिणी चटूले, दीक्षा मेश्राम या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंचावरील मान्यवरांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच प्रमुख वक्ते हरीश ससनकर यांच्या कार्याचा परिचय आरती श्रावने यांनी करून दिला, संचालन पायल चौखे या विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन असतमुनी गायकवाड या विद्यार्थ्याने केले. यशस्वीतेसाठी राऊत, संजय अंड्रस्कर, शिंदे, अमृतकर, सुनील फुलभोगे, रजा, आडे, मत्ते, मिश्रा या व अन्य शिक्षकांनी प्रयत्न केले.