Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

चंद्रपुरात देहव्यापार अड्ड्यावर छापा

७ जणांना अटक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात एका अपार्टमेंटमध्ये देहव्यापार सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत पाच महिलांना ताब्यात घेतले.सरकारनगरातील सगीरा अपार्टमेंट येथिल तिसऱ्या माळ्यावर हा देहव्यापाराचा अड्डा सुरू होता.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
अपार्टमेंटमध्ये बनावट ग्राहक बनवून पाठविण्यात आले ,याच दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
यावेळी पाच महिला कुंटणखान्याची मालकीण आशा आणि तिचा मुलगा सचिन श्यामराव घनोट याला ताब्यात घेतले. रामनगर पोलिस ठाण्यात या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शंकर मुटेकर, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, अमजद पठाण, सपना साखरे, भारती करकाटे, प्रिया पोले, सीमा सावळे यांच्या पथकाने केली.







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.