Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

उत्तर पुर्व युवा-आदान प्रदान कार्यक्रम समारोप


नागपूर- गृह मंत्रालय, भारत सरकार व युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केन्द्र संगठन, व नेहरू युवा केंद्र नागपूर व्दारा दि. 11 पासून 16 फेब्रुवारी पर्यंत आयोजित उत्तर पुर्व युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन अण्णासाहेब गुंडेवार महाविद्दालयातील दादासाहेब कन्नमवार सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या समारोपीय सभारंभाकरीता प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार, पद्मश्री मा. डॉ.विकास महात्मे, मा. आमदार गिरीश व्यास, मा.आमदार विकास कुंभारे, पोलिस आयुक्त मा.श्री.भूषणकुमार उपाध्याय, प्राचार्य देवेंद्र मोहतुरे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी संजय दुधे हे होते.

आपल्या मार्गदर्शनीय भाषणात राज्यसभा खासदार, पद्मश्री मा. डॉ.विकास महात्मे यांनी देश एक संघ ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. उत्तर पुर्व राज्यातील आपल्या भेटीची माहिती शिबीरार्थीना देवून सिक्कीम राज्यातील मातृसत्ताक पध्दतीचे प्रशंसा त्यांनी केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्पर संस्कृतिक वैचारीक देवाण घेवाण होवून एक भारत श्रेष्ठ भारत हि संकल्पना यशस्वी होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

आपल्या मार्गदर्शनात आ.गिरीश व्यास यांनी सांगितले की,या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुर्वोत्तर राज्याची संस्कृति व महाराष्ट्राच्या संस्कृतिची देवाण घेवाण करण्याची संधी पुर्वोत्तर राज्यातून आलेल्या सर्व शिबीरार्थींना मिळाली आहे. हिमालयीन क्षेत्र भारताचा मुकुटमणी आहे. या पर्वतीयक्षेत्रात प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत युवक प्रगती करीत आहे हि अभिमानाची बाब आहे. देशातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

आपल्या मनोगतात आ.विकास कुंभारे यांनी सांगितले की, विविध प्रांतातील लोकांच्या परंपरा,संस्कृति वेगवेगळया असून सुध्दा आम्ही सर्व एक आहोत. सर्व धर्म पंथ व विविध संस्कृतिचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. युवकांनी एकत्रित येवून परस्पर सद्भाव वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

पोलिस आयुक्त मा. डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी युवकांमध्ये प्रचंड उर्जा, शक्ती आहे. युवकांनी आपल्या शक्तीचा उपयोग सकारात्मक कार्यासाठी करावा. ज्याप्रमाणे विविध नद्यांच्या प्रवाहाला आपल्यात समावून घेण्याचे सामर्थ्य विशाल सागरात आहे तसेच सामर्थ ठेवून आपल्या देशाची एकता अखंडता टिकवून ठेवण्यासाठी युवकांनी सर्वांना सोबत घेवून चालावे असे आवाहन केले.

तसेच अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र मोहतुरे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा समन्वयक श्री शरद साळुंके यांनी केले.

कार्यक्रमाच्या सरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शिबीरार्थींना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच विविध राज्यातील प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.

संचलन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक विरसिंह यांनी तर आभार प्रदर्शन लेखापाल अखिलेश मिश्रा यांनी केले.स्वागतगीत मणीपूर राज्याच्या चमूने सादर केले.

सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध राज्यातील चमुंनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये महाराष्ट्राच्या नंदूरबार येथिल संस्कृतिचे प्रसिध्द हरीयाँ आदिवासी नृत्य नागपूरच्या युवकांनी सादर करुन वाहवा मिळविली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा युवा समन्वयक हितेंद्र वैद्य, लेखापाल संजय राऊत, , अनिल ढेंगे, रमेश अहिरकर,अजयसिंग राजपूत, दयाराम रामटेके, कार्यक्रम समन्वयक श्री. देवेंद्र कुमार, श्री.पवन कुमार, ओमप्रकाश, अविनाशकुमार यादव, छत्रपाल सिंह, नरेंद्र प्रताप, श्री., मंगेश डुबे, देवेंद्र इखार, संध्या जुननकर, तसेच सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक विनोद कोहळे, आकाश बेहनीया, विकेश जंजाळ, शाम जुनघरे, आकाश धांडे, आश्विन वाडीभस्मे, अमोल चौधरी, अभिमान खराबे, शेखर रोडे, नितेश मदनकर, गजाला खान, सुरेखा धराडे, मोनिका जंजाळ, गौरव दलाल यांनी अथक परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.