राजु पिसाळ/ पुसेसावळी:
खटाव तालुक्यातील चोराडे येथील फाटयाजवळ अवैध वाळू वाहतुक करणार्या ट्रकवर कारवाई करण्यात आली,
अवैध पोलीसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमासास मायणी कडुन येत असलेल्या लाल रंगाच्या ट्रकमधुन १० ब्रास इतकी वाळू असल्याचे निदर्षनास आले.
तर ट्रक चालक भिमाशंकर हरिचंद्र चव्हाण (वय २९) रा. सैदापुर ता.कराड, तर दुसरा ट्रक चालक गोपाळ कल्लाप्पा बन्नेनवर (वय २३) रा.गोवारे ता.कराड या दोघांना वाहन चालविण्याचा परवाना तसेच नमुद ट्रकची कागदपत्रे न बाळगता बेकायदा बिगरपरवाना वाळू उत्खनन करुन दोन्ही ट्रकमध्ये १० ब्रास गाैण खनिज वाळू किंमत व ट्रक किंमत असा एकुण ३०७००००/- रूपयेचा माल चोरटी वाहतुक करित असलेने कारवाई करण्यात आली.तसेच दोन्ही ट्रकचे नंबर एम.एच.५० / २१०७ एकसारखे असल्याचे आढळुन आले.
तरी अधीक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील करित आहेत.