लोकार्पण सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न
राजु पिसाळ / पुसेसावळी :
खटाव तालुक्यातील पुसेसावळीतील प्राथमिक या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये तेरा प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जाणार आहेत त्यात प्रामुख्याने कर आरोग्य केंद्राचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रात झाले असून याचा लोकार्पण सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे करण्यात आला,
यामुळे पुसेसावळीसह परिसरातील रुग्णांना या नवीन उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे, तरी यांच्या माध्यमातून घरोघरी तपासणी केली जाईल त्यामध्ये बीपी. शुगर सारख्या तपासण्या करून अौषधोपचार केले जाणार असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डाॅ.भगवान पवार यांनी मांडले.ते पुसेसावळी (ता.खटाव) येथे आरोग्यवर्धिनी केंद्रात रुपांतर लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी वर्धन अॅग्रोचे अध्यक्ष श्री. धैर्यशील कदम, समाजकल्याण सभापती श्री.शिवाजीराव सर्वगोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडिकर, पं.स.सभापती साै.कल्पना मोरे, पं.स.सदस्या साै.जयश्री कदम,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. युनुस शेख, सरपंच साै.मंगल कदम, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ.पवार पुढे म्हणाले की या परिसरातील कळंबी,राजाचे कुर्ले, पळशी, भोसरे या चारही उपकेंद्राचे या आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर झाले आहे, तरी या उपकेंद्रामध्ये प्रशिक्षीत डाॅक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका देऊन आरोग्य सुविधा बळकटीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे.
या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये प्रामुख्याने प्रसूतीपूर्व व प्रस्तुती सेवा, नवजात बालक,किशोरवयीन आजार ,कुटुंब नियोजन, संसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य नियोजन,संसर्गजन्य रोग नियोजन,नाक कान घसा डोळे आजारासंबंधी सेवा,दंत व मुखरोग अारोग्य सेवा,आपत्कालीन सेवा, योग निसर्गेपचार व वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार सेवा अशा तेरा सेवा रुग्णांनस दिल्या जाणार आहेत,तरी याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने केले.
तद्नंतर धैर्यशील कदम,शिवाजीराव सर्वगोड, कल्पना मोरे आदिंची भाषणे झाली.यावेळी श्रीकांत पाटील, पुसेसावळीचे प्राथमिक आरोग्य अधिकारी डाॅ.अमित ठिगळे, ग्रामसेवक के.डी.भोसले, ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, ज्ञानदेव पवार, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व पुसेसावळीतील ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक डाॅ.अमित ठिगळे यांनी केले, तर आभार विरधवल शिंदे यांनी मानले.