नागपुर/प्रतिनिधी :-
नागपुर शहराच्या फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवा-याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत नागपुर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
“शहर समृद्धि उत्सव” अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शहरी बेघर निवारातील बेघरांना आयनॉक्स जसवंत तुली मॉल इंदोरा येथे “गल्ली बॉय” हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एस्केलेटर सवारी मुळे बेघरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. त्यावेळी त्या सर्व बेघर व्यकीच्या चेहरयावरील आनंद बघुन उपस्थित सर्वाना समाधान मिळाले. याप्रसंगी बेघरांसह DAY-NULM चे व्यवस्थापक श्री प्रमोद खोब्रागडे यांचेसह सर्व निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, फेब्रुवारी १७, २०१९
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments