Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १६, २०१९

सुशील चंद्रा यांनी स्वीकारला निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार


नवी दिल्लीदि. 16 : भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह श्री. चंद्रा हे निवडणूक आयोगाचे कामकाज पाहणार आहेत.
श्री. चंद्रा यांचा जन्मदिनांक दि. 15 मे 1957 असून ते 1980 च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकारी आहेत. त्यांनी आय.आर.एस. सेवेदरम्यान उत्तर प्रदेशमहाराष्ट्रराजस्थानदिल्ली आणि गुजरात आदी राज्यामध्ये काम केले आहे. रुरकी विद्यापीठ तसेच डेहराडून येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले आहे.
श्री. चंद्रा यांनी अंतर्गत कररचना आणि अन्वेषण कार्यात विशेष योगदान दिले आहे. मुंबई येथे अन्वेषण विभागाचे संचालक आणि गुजरातचे अन्वेषण महासंचालक म्हणून प्रभावी कामकाज केले असून सिंगापूरआयआयएम बेंगळुरू आदी ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार संभाळण्यापूर्वी ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालयमहसूल विभागांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सी.बी.डी.टी.) अध्यक्ष म्हणून तसेच सी.बी.डी.टी.चे सदस्य (अन्वेषण) म्हणून कार्यरत होते.

Shri Sushil Chandra takes over as new Election Commissioner

Shri Sushil Chandra has assumed charge as the new Election Commissioner (EC) of India today on 15th of February 2019 and joins the Commission with Chief Election Commissioner Shri Sunil Arora and Election Commissioner Shri Ashok Lavasa.

Sh. Sushil Chandra assuming charge as the new Election Commissioner of India

Born on 15th May 1957 Shri Chandra is a 1980 batch Indian Revenue Service Officer. In the IRS service Shri Chandra has rendered his service in various States viz; Uttar Pradesh, Rajasthan, Delhi, Gujarat and Maharashtra.

Acquiring his academic proficiency from Roorkee University and LL.B. from D.A.V. College, Dehradun, Shri Chandra has worked extensively in the areas of International Taxation and Investigation at various places. Shri Chandra brings rich experience from his position of Director of Investigation, Mumbai and Director General (Investigation), Gujarat. Besides this, he has undergone various training programmes at Singapore, IIM Bangalore & Wharton.

Prior to joining ECI Shri Chandra held the office of Chairman in Central Board of Direct Taxes, Department of Revenue, Ministry of Finance, and Government of India and was also Member (Investigation), C.B.D.T.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.