Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १६, २०१९

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत



नागपूरदि. 16 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे  भारतीय हवाईदलाच्या विशेष विमानाने नवी दिल्ली येथून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 9.50 वाजता आगमन झाले. विमानतळावर प्रधानमंत्री यांचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रधानमंत्री यांचे स्वागत केले. विमानतळावर स्वागताचा स्वीकार करुन यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित कार्यक्रमासाठी भारतीय हवाईदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने येथून रवाना झाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पांढरकवडा येथील नियोजित कार्यक्रमानंतर हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 1.30 वाजता आगमन झाले. येथून भारतीय हवाईदलाच्या विशेष विमानाने जळगावसाठी प्रयाण झाले. विमानतळावर निरोप देण्यासाठी  राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर  श्रीमती नंदाताई जिचकार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.