Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

*महा मेट्रो मोबाइल ऍपच्या मदतीने प्रवास होणार सहज-सोपा

मेट्रो स्टेशनप्रवासी दरमार्गिकावेळापत्रक मिळणार माहिती


नागपूर २१ आरडीएसओ पथकाच्या च्या देखरेखीखाली यशस्वीपणे ट्रायल रन झाली असतांआतायेत्या काळात प्रवासी सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने महा मेट्रो नागपूरतर्फे मोबाइल ऍपच्या (एप्लीकेशन) माध्यमातून प्रवाश्यांना शहरात कुठेही सहज प्रवास करता येणार आहे. महा मेट्रोचे हे ऍप नागरिकांना अँड्रॉइडआणि आयफोन'च्या ऍप स्टोर'वरून सहजरित्या डाऊनलोड देखील करता येणार आहे. 


या ऍप'साठी कोणतेही शुल्क नागरिकांना द्यावे लागणार नसून ते पूर्णपणे मोफत असणार आहे. इंटरनेट आणि जीपीआरएस वर चालणार हे ऍप जीपीएसच्या साह्याने महा मेट्रो नागपूर आणि इतर सार्वजनिक वाहतूक संबंधित सर्व माहिती प्रदान करेल. महा मेट्रो नागपूर आपल्या प्रवाश्यांसाठी यूजर फ्रेंडली स्मार्टफोन मोबाइल एप्लिकेशन लॉन्च करण्यास सज्ज आहे. 

एप स्टोर'वरून हे ऍप डाऊनलोड करताच ऍप'वर देण्यात आलेल्या क्यूआर कोड'च्या माध्यमातून नागरिकांना सहज मेट्रोचे तिकीट खरीदी करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे महा कार्ड'चे रिचार्ज सुद्धा या ऍप'ने करणे शक्य आहे. नेव्हिगेशन'च्या माध्यमातून जवळच्या मेट्रो स्टेशनची आणि स्टेशन नजीकच्या पर्यटन स्थळाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल.

तसेच मेट्रो प्रवासाचे दरमेट्रो मार्ग (रूट मॅप)नकाशामेट्रो ट्रेनचे वेळापत्रकपार्किंग इ. संबंधित सर्व माहिती एप'वर उपलब्ध असेल. याशिवाय महा मेट्रोच्या बाइसिकलई-सायकलई-रिक्शाई-स्कुटरआटो-रिक्शाटॅक्सीबस व इतर सार्वजनिक वाहतूक संबंधित सर्व माहिती नागरिकांना या माध्यमाने सहज मिळेल. 

मल्टी मोडल इंटिग्रेशनच्या (एमएमआय) माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने शहरात निर्माणाधीन महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून लवकर महा मेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवेला देखील सुरवात होणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर हे एप तयार करण्यात येत आहे.
यामुळे नागरिकांना सहज आणि सोयीस्कर प्रवास या एप'च्या माध्यमातून करता येईल.महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील प्रमुख घटकांपैकी एक मल्टी मोडल इंटिग्रेशन किंवा फीडर सर्व्हिस नेटवर्क आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरण (एनयूटीपी) प्रमाणे नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनंवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महा मेट्रो कार्य करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.