Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०८, २०१८

गुरुला समर्पित होऊन कला शिका

कला ही पैसे देऊन नव्हे तर गुरुला समर्पित होऊन शिकायची असते :- डॉ. प्रशांत गायकवाड

आर्वी-कलेत पारंगत करण्याचे आश्वासन देऊन पैसे कमविन्याचा धंदा सुरु झाला आहे अशी टिका संगीत रत्न अवार्ड ने सम्मानित तबला वादक डॉ प्रशांत गायकवाड़ यानी पत्रकार परिषदेत करून कला ही पैसे देऊन नव्हे तर गुरुला समर्पित होऊन शिकायची असते असे प्रतिपादन केले.
रविवारला आर्वी येथील विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली होती . या वेळी मल्हार फ़िल्म आर्ट चे संस्थापक अक्षय अहिव , संचालक अमित अहिव , सहसंचालक अमोल अहिव , मल्हार फ़िल्म आर्ट चे नितिन गवली , रानी पुनसे ,प्रियंका पुनसे ,शरवरी अजमीरे ,अमर खसर, अक्षय खरपे , आकाश कोल्हे उपस्थित होते.

डॉ प्रशांत गायकवाड़ यांनी सन २००९ साली सलग ३२४ तास वादन केल्यामुळे त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ड रिकॉर्ड मधे झाली. या शिवाय लिमका बुक , नागपुर पदम् भूषण ,  विदर्भ गौरव कला भूषण अवार्ड ,रोटरी व्होकेशनल एक्सीलेंट अवार्ड व अन्य पुरस्कार प्राप्त केले आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.