- मेट्रोची गणेश उत्सव स्पर्धा
- मेट्रो थीम वर करा पेंडालची आकर्षक सजावट
- तुमच्या मंडळाला भेट देण्यासाठी येणार मेट्रोची टिम
नागपुरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सर्वीकडे होताना दिसत आहे. बाल गणेश उत्सव मंडळ, युवा गणेश उत्सव मंडळ असे विविध मंडळ आणि त्यात कार्य करणारे बाप्पाचे लाडके भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महा मेट्रोने नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महा मेट्रो नागपूरने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मेट्रोच्या थीमवर डिझाईन तयार करून उत्कृष्ट सजावट करणाऱ्या मंडळांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी व कौटुंबिक सदस्यांनी महा मेट्रोच्या ganeshotsav.mazimetro@gmail.com या ई-मेल वर सजावट केलेले फोटो पाठविण्याचे आणि ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महा मेट्रो नागपूरने केले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भक्तांना आपल्या सार्वजनिक मंडळाची सजावट मेट्रोच्या थीमवर करणे आवश्यक आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत विविध कार्याची प्रतिकृती मंडळांना देता येईल. एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन खापरी मेट्रो स्टेशन याशिवाय महा मेट्रो कोचची थीम मंडळांना सादर करता येणार आहे. तर मेट्रो थीमशी संबंधित रेखाचित्र देखील मंडळे आपल्या पेंडाल मध्ये लावून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. महा मेट्रोच्या ई-मेल (ganeshotsav.mazimetro@gmail.com) वर पाठविण्यात आलेल्या छायाचित्रांची निवड करण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या मंडळांना महा मेट्रोची टिम प्रत्यक्ष भेट देऊन पेंडाल सजावटीचे निरीक्षण करेल.
महा मेट्रो प्रकल्पाविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्याकरता विविध उपक्रम महा मेट्रो राबवित असते. वाहतुकीचे नियम पाळण्याचा व पर्यावरणाचे संवर्धनाचा संदेश नागपूरकरांना देऊन जनजागृती केली जाते. या पार्शवभूमीवर गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या महा मेट्रोच्या गणेश उत्सव स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. तब्बल १ हजारच्या वर सार्वजनिक मंडळाने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. घरी गणेश मूर्ती बसवून आकर्षक सजावट करणारे भक्त देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असा विश्वास महा मेट्रो तर्फे व्यक्त करण्यात आला आहे.