Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०६, २०१८

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार


चंद्रपूर :- 
चंद्रपूरपासून 20 किलोमीटरवर असलेल्या चिचपल्लीच्या बफर झोनमधील हळदी गावाजवळ जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गीता सीडाम असे मृत महिलेचे नाव आहे. गीता सिडाम हि सकाळी जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती. मात्र दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व शव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास वनविभाग करीत आहे. मात्र या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.