Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १५, २०१८

पोलिसांनी टेम्पोसह उचलला DJ

रायगड - गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून दीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत अलिबागमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी कारवाई करत अलिबाग पोलिसांनी डीजेचे साहित्य, टेम्पो आणि जनरेट असा 9 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
अलिबाग शहरातील तळकर नगर येथे राहणारे संतोष जाधव यांनी दीड दिवसाची गणपती विसर्जन मिरवणूक काढली होती. यावेळी ध्वनी प्रदूषण पथक हे ब्राम्हण आळी ते रामनाथ येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी जाधव यांच्या गणरायाच्या मिरवणुकीत डीजे सारखे ध्वनी प्रदूषण वाद्य मोठ्या कर्कश आवाजात वाजविले जात असल्याचे पथकाच्या निर्दशनात आले. डीजेच्या ध्वनी तीव्रता यंत्राने तपासणी करुन प्रिंट काढली असता ती 63.3 डेसीबल एवढी इतकी भरली. 
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष जाधव, डीजे चालक रोहित सुरेश पाटील, वाहन चालक स्वप्नील दिलीप लिंगम, जनरेटर चालक उत्कर्ष विकास चवरकर यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अन्वये अलिबाग पोलिसांनी कारवाई केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.