Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पोलिस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलिस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, सप्टेंबर १५, २०१८

रामदासपेठेतील सलून आणि हाॅटेलमधून 8 मुली ताब्यात

रामदासपेठेतील सलून आणि हाॅटेलमधून 8 मुली ताब्यात

नागपूर/प्रतिनिधी:- 
शहरातील उच्चवर्णियांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या रामदासपेठ येथील ‘अजय सलून अ‍ॅण्ड स्पा’मध्ये देहव्यापार चालत असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी छापा टाकत एका ग्राहकाला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी स्पा मधून पाच आणि लोहारकर हॉटेलमधून तीन अशा आठ मुलींला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
रामदासपेठ ते कांचिपूर भागाला जोडणाऱ्या मार्गावर अजय लोहारकर यांची अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. त्यातच ‘अजय सलून अ‍ॅण्ड स्पा ’ हे असून त्या ठिकाणी देहव्यापार चालत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त पंडित यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी एका ग्राहकही सापडला.

पोलिसांनी टेम्पोसह उचलला DJ

पोलिसांनी टेम्पोसह उचलला DJ

रायगड - गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून दीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत अलिबागमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी कारवाई करत अलिबाग पोलिसांनी डीजेचे साहित्य, टेम्पो आणि जनरेट असा 9 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
अलिबाग शहरातील तळकर नगर येथे राहणारे संतोष जाधव यांनी दीड दिवसाची गणपती विसर्जन मिरवणूक काढली होती. यावेळी ध्वनी प्रदूषण पथक हे ब्राम्हण आळी ते रामनाथ येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी जाधव यांच्या गणरायाच्या मिरवणुकीत डीजे सारखे ध्वनी प्रदूषण वाद्य मोठ्या कर्कश आवाजात वाजविले जात असल्याचे पथकाच्या निर्दशनात आले. डीजेच्या ध्वनी तीव्रता यंत्राने तपासणी करुन प्रिंट काढली असता ती 63.3 डेसीबल एवढी इतकी भरली. 
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष जाधव, डीजे चालक रोहित सुरेश पाटील, वाहन चालक स्वप्नील दिलीप लिंगम, जनरेटर चालक उत्कर्ष विकास चवरकर यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अन्वये अलिबाग पोलिसांनी कारवाई केली.

गुरुवार, जानेवारी २५, २०१८

15 हजाराची लाच घेतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात अटक

15 हजाराची लाच घेतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
अवैध दारू विक्री प्रकरणात चंद्रपूर शहरातील  दुर्गापूर पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौखाजी मारोती पिपरे  बक्कल नंबर. 280 
यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत  15 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली .पिपरे हे दुर्गापूर पोलिस स्टेशनचे विद्यमान ठानेदार यादव यांचे रायटर म्हणुन सम्पूर्ण काम सांभाळत असल्याची माहिती आहे.

दारू विक्रीचा खोटा पंचनामा करत दुचाकी व मोबाइल जप्त केला यात गुन्ह्यात जप्त झालेला मुद्देमाल परत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौखाजी मारोती पिपरे यांनी आरोपिस 25000 रूपयाची  मागणी केली.मात्र तितकी रक्कम शक्य नसल्याने शेवटी 15 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली व ते पोलिस स्टेशनमध्येच देण्याचे ठरविले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दारू विक्रेत्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिली होती.  त्यानुसार  बुधवारी  सापळा रचून  15 हजार रुपये रोख स्वीकारताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस स्टेशनमध्येच पिपरे यांना अटक केली.

 जिल्ह्यात दारूबंदी असतांनादेखील विविध प्रकारे जिल्ह्याभरात दारूचा अवैध साठा येतो व तो शहरातील विविध भागातील विकला देखील जातो त्याला पोलिस विभागाचे पाठबळ असल्याचे या प्रकरणातून विश्वासीत समोर येत आहे.आरोपी पिपरे यांचे अवैध धंदेवाल्यांसोबत गोड संबंध असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पो.हवालदार मनोहर एकोणकर , ना.पो.का संतोष येलपुलवार महेश मांढरे,सुभाष गोहोकर,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, समीक्षा भोंगडे,राहुल ठाकरे  यांनी पार पडली  

रविवार, जानेवारी ०७, २०१८

गर्द पावडरसह १ आरोपी अटकेत

गर्द पावडरसह १ आरोपी अटकेत

नागपूर/प्रतिनिधी:
सीताबर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व पोलिसांनी ५१३ ग्राम गर्द पावडर सह एकूण ५ लाख १३ हजाराचा मुद्देमाल शहर बस्थानाक नागपूर येथून जप्त केला  मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या परिसरात एक इसम अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी एक संशयित ईसमाला  दोन पंचासमक्ष ताब्यात घेतले व आरोपीकडून  कडून ५ लाख १४ हजार ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलसांनी कारवाई करत एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.  सदरची कारवाई पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेने पूर्ण केली.

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र

चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीमेतंर्गत अवैध दारूविक्रीच्या जिल्हयात
एकुण 26 केसेस:-
महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याात दिनांक 01/04/2015 पासुन दारूबंदी घोषीत
करण्यात आलेली असुन पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवुन दिनांक
26/11/2017 चे 00ः01 ते 23ः59 वाजता पर्यंत जिल्ह्याात पोलीस स्टेशन  घुग्घुस, दुर्गापुर, शेगाव,
माजरी, ब्रम्हपुरी, नागभिड, चिमुर, सिंदेवाही, पोंभुर्णा, सावली, राजुरा, विरूर हददीत एकुण
20,00,870/-रू ची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन ला एकुण 26 गुन्हयाची नोंद
करण्यात आली असुन 03 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------
रोडवर धोकादायक स्थितीत वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन धारकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन घुग्घुस:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन घुग्घुस अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अषा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन घुग्घुस येथे
अप.क्र. 678/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन चिमुर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चिमुर अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
चिमुर येथे अप.क्र. 651/2017 व 652/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील 02 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन दुर्गापुर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन दुर्गापुर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा  स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अप.क्र. 458/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास दुर्गापुर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन भद्रावती:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
भद्रावती येथे अप.क्र. 1086/2017 व 1087/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले
आहे. सदर गुन्हयातील 02 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपी वाहन चालकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहरः-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप.क्र. 1569/2017 कलम
184, 185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आली असून पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीः-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेषन ब्रम्हपुरी येथे अप.क्र. 1124/2017 कलम 184,
185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात
आली असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन रामनगर हददी त संषयास्पदरित्या फिरणाऱ्या आरोपीतांना अटकः-
दिनांक 26/11/2017 रोजी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर येथे 23ः45 वाजता
दरम्यान 01 आरोपी इसम हा आपले अस्तित्व लपवुन कोणतातरी हस्तपेक्षीय गुन्हा करण्याचे उद्देशाने
फिरत असता मिळुन आल्याने पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. 1614/2017 कलम 122 (ब)
मुंबंई पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आले असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
मुंबई जुगार कायदा अन्वये कार्यवाही:-
पोलीस स्टेशन विरूर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन विरूर अंतर्गत कविठपेठ येथे 02 आरोपी इसम हा
सार्वजनिक ठिकाणी कोंबडयांची झुंजीवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगाराचा खेळ खेळताना
मिळुन आल्याने पो.स्टे. विरूर येथे अप.क्र. 437/2017 कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये
गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हयात घटनास्थळावरून जुगारच्या साहीत्यासह नगदी
असा एकुण 3,850/-रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास विरूर पोलीस करीत
आहे.
----------------------------------------------------------------------------------
प्रतिबंधक कारवाई:-
दिनांक 26/11/2017 रोजी जिल्ह्यात कलम 107 दंड प्रक्रिया संहिता अन्वये 12, कलम 122 मुंबई
पोलीस कायदा अन्वये 01, कलम 110/117 मुंबई पोलीस कायदा अन्वये 01 असे एकुण 14 ईसमांवर
प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------------------------------
मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई:-
दिनांक 26/11/2017 रोजी जिल्ह्याात मोटार वाहन कायदा अन्वये रिफलेक्टर/नोपार्किंग 03, दारू
प्राशन 02, इतर केसेस 166 एकुण 171 केसेस करण्यात आल्या आहेत.
----------------------------------------------------------------------------------