Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २०, २०१८

संशयित किडणीचोर म्हणून पकडलेले निघाले शिकारी

 रामटेक पोलीसांची अक्षम्य दिरंगाई,प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
वनविभागाकडून आरोपीविरुद्ध शिकारीचा गुन्हा दाखल . 
रामटेक(तालूका प्रतिनिधी): 
रामटेक तालूक्यातील गावांमध्ये व परीसरांत सध्या किडणीचोर सुटले असल्याची अफवा सर्वदूर पसरलेली असतांनाच रामटेक पासून 8 किमी अंतरावरील नगरधन या गावातल्या लोकांनी दिनांक 18 जुन 2018 ला फाॅरच्युनर क्रमांक एम एच -31 सी एक्स 7000 मध्ये संशयितरीत्या फीरत असलेल्या तीन ईसमांना पकडून राञी साडेअकराच्या सुमारात रामटेक पोलीस ठाण्यांत आणले. असतांना पोलीसांनी याबाबत थातुरमाथुर चौकशी करुन त्यांना सोडून दिले होते . माञ दुसर्‍या दिवशी रामटेकच्या नगरधन भागात हरीण ( काळविट ) चा मृतदेह सापडल्याची बातमी रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोर्‍हाडे यांना कळली व त्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला .राञी गावकर्‍यांनी पोलीस ठाण्यात पकडून आणलेले शिकारी होते ही बाब उघड झाल्याने रामटेक वनविभागाने आरोपीविरुध्द शिकारीचा गुन्हा दाखल केला आहे . रामटेकचे वनक्षेञपाल श्रावण खोब्रागडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत . याबाबत सविस्तर वृत्त असे की , सध्या या भागात काडणीचोर फीरत असल्याची अफवा सोशल मीडीयावर मोठया प्रमाणावर सुरु असुन त्यामुळे गावातील नागरीक हे राञी उशीरापर्यंत आपल्या गावांमध्ये जागली करीत आहेत या पार्श्वभुमीवर रामटेकजवळच्या नगरधन या गावातील लोकांनी उपरोक्त संशयीतांना पकडले व रामटेकच्या पोलीस ठाण्यांत आणले माञ सदर व्यक्तीची चौकशी केली . असतांना त्यांनी १) रिझवान अहमद अब्दुल वहाब अन्सारी वय 38 रा . लष्करीबाग मस्जिदजवळ नागपुर , २) मोहम्मद आसिफ अंसारी वय 36 रां मोमीनपुरा मोहम्मद अली रोड नागपूर ,व रियाज अहमद मोहम्मद मीयां वय 35 रा. नागपुर  अशी नावे सांगीतली पोलीसांनी याबाबत थातुरमातुर चौकशी करुन या तिघांनाही राञीच सोडून दिले होते . 
माञ दुसरा दिवस  दिनांक 19 जुन 2018 रोजी सकाळी रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोर्‍हाडे यांना याबाबत मीळतांच वनविभाग जागा झाला .नगरधन भागात चौकशी करुन काळविटाचा मृतदेह वनविभाग रामटेकचे वनक्षेञपाल खोब्रागडे यांनी ताब्यात घेतला व गुन्हा दाखल केला . बातमी लिहीस्तोवर कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती . रामटेक पोलीस स्टेशनचे प्रभारी पोनी दिपक वंजारी यांनी याबाबत विचारले असतांना राञी या लोकांनी शिकार केल्याची माहीती न मीळाल्याने आम्ही त्यांचे बयाण घेवून तसेच त्यांची नावे पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदवून त्यांना सोडले होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.