Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २०, २०१८

२१ जूनला नागपूरकर करणार सामूहिक योग

नागपूर महानगर पालिकेचे आयोजन : विविध संस्थांचा सहभाग
नागपूर/प्रतिनिधी:

विश्व योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर २१ जून रोजी सकाळी ५.४५ वाजतापासून यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगासन करणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध योगाभ्यासी मंडळांचा सहभाग राहणार असल्याची माहिती कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी यशवंत स्टेडियम येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. 
योग दिनाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रा. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपाचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी,विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल, राकाँचे गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा रॉय उपस्थित राहतील. योग दिनाच्या या मुख्य कार्यक्रमात नागपूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहापौर तथा कार्यक्रम संयोजक दीपराज पार्डीकर, सहसंयोजक तथा शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे. 
पत्रपरिषदेला विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका दिव्या धुरडे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, विलास फडणवीस उपस्थित होते.

विविध मंडळांचा सहभाग

नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी. ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएनश, सहज योगध्यान केंद्र, योग सूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा सहभाग राहील. 

प्रवेशासाठी १० गेटची व्यवस्था

यशवंत स्टेडियम येथे योगप्रेमींना प्रवेशासाठी १० गेटची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मुख्य द्वार असतील. हे दोन्ही द्वारे व्हीआयपींच्या प्रवेशासाठी असतील. गेट क्र. १ देवी मंदिराजवळ असेल. तेथून पुढे आठ गेट असतील. प्रमुख पाहुणे गेट क्र. १२ मधून व्यासपीठाकडे येतील. सहभागी होणाऱ्यांनी पांढरा पोषाख घालून येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

बसेसची व्यवस्था

योगप्रेमींना यशवंत स्टेडियम मध्ये पोहचण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणांहून या बसेस यशवंत स्टेडियमकडे येतील. पहाटे ५.३० वाजतापासून या बसेस प्रवाशांच्या सेवेत असतील. एसबीआय जयप्रकाश नगर, मालवीय नगर खामला, सोनेगाव (शंकरनगर मार्गे), अत्रे ले-आऊट लक्ष्मीनगर चौक, सूर्या नगर उद्यान (सेंट्रल एव्हेन्यू मार्गे), अयाचित मंदिर, श्री श्रद्धानंद अनाथालय, वीरचक्र कॉलनी साई मंदिर काटोल रोड, सखारामपंत उद्यान मंगळवारी बाजार, त्रिमूर्ती नगर, जुना दिघोरी बस स्टॉप या ठिकाणाहून ५.३० वाजता शहर बस सुटेल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.