Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

योग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
योग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून २०, २०१८

  २१ जूनला नागपूरकर करणार सामूहिक योग

२१ जूनला नागपूरकर करणार सामूहिक योग

नागपूर महानगर पालिकेचे आयोजन : विविध संस्थांचा सहभाग
नागपूर/प्रतिनिधी:

विश्व योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर २१ जून रोजी सकाळी ५.४५ वाजतापासून यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगासन करणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध योगाभ्यासी मंडळांचा सहभाग राहणार असल्याची माहिती कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी यशवंत स्टेडियम येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. 
योग दिनाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रा. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपाचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी,विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल, राकाँचे गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा रॉय उपस्थित राहतील. योग दिनाच्या या मुख्य कार्यक्रमात नागपूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहापौर तथा कार्यक्रम संयोजक दीपराज पार्डीकर, सहसंयोजक तथा शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे. 
पत्रपरिषदेला विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका दिव्या धुरडे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, विलास फडणवीस उपस्थित होते.

विविध मंडळांचा सहभाग

नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी. ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएनश, सहज योगध्यान केंद्र, योग सूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा सहभाग राहील. 

प्रवेशासाठी १० गेटची व्यवस्था

यशवंत स्टेडियम येथे योगप्रेमींना प्रवेशासाठी १० गेटची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मुख्य द्वार असतील. हे दोन्ही द्वारे व्हीआयपींच्या प्रवेशासाठी असतील. गेट क्र. १ देवी मंदिराजवळ असेल. तेथून पुढे आठ गेट असतील. प्रमुख पाहुणे गेट क्र. १२ मधून व्यासपीठाकडे येतील. सहभागी होणाऱ्यांनी पांढरा पोषाख घालून येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

बसेसची व्यवस्था

योगप्रेमींना यशवंत स्टेडियम मध्ये पोहचण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणांहून या बसेस यशवंत स्टेडियमकडे येतील. पहाटे ५.३० वाजतापासून या बसेस प्रवाशांच्या सेवेत असतील. एसबीआय जयप्रकाश नगर, मालवीय नगर खामला, सोनेगाव (शंकरनगर मार्गे), अत्रे ले-आऊट लक्ष्मीनगर चौक, सूर्या नगर उद्यान (सेंट्रल एव्हेन्यू मार्गे), अयाचित मंदिर, श्री श्रद्धानंद अनाथालय, वीरचक्र कॉलनी साई मंदिर काटोल रोड, सखारामपंत उद्यान मंगळवारी बाजार, त्रिमूर्ती नगर, जुना दिघोरी बस स्टॉप या ठिकाणाहून ५.३० वाजता शहर बस सुटेल.

मंगळवार, जून १२, २०१८

आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा होणार

आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा होणार

संबंधित इमेजमुंबई/प्रतिनिधी:
संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. याच दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा होणार आहे.
गेल्या जवळपास 5 हजार वर्षापासून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या महत्वाची असून राज्यभरात चौथ्या जागतिक योगा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा वर्ग, सामान्य व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात हा दिन साजरा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी विविध ठिकाणी योगा उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीचे आयोजन शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एनएसएस, नेहरु युवा केंद्र इत्यादी युवा संघटनांनीही योगा संबंधातील कार्यकमाचे आयोजन करण्यात यावे असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या योजनासंदर्भातील अन्य माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी आणि विभाग पातळीवर विभागीय आयुक्त यांनी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच या उपक्रमाकरिता क्रीडा व युवक सेवा आयुक्त यांची राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, योगादिन आयोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळा आणि पुणे येथील कैवल्यधाम, सांताक्रूझ येथील दि योगा इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या मामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट या तीन योग संस्थांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्व शाळांमध्ये योगदिन साजरा करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय कार्यालयामध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.