Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रामटेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रामटेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर ०८, २०१८

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध

आरोपीस दहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

रामटेक तालुका प्रतिनिधी- मध्य प्रदेशातील सिवनी येथील पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार रामटेक येथील मूनलाइट हॉटेल मध्ये आणून तिच्याशी शरीर संबंध स्थापन करणाऱ्या आरोपीस रामटेक पोलिसांनी 7 आँक्टोंबर 2018 रोजी अटक केली. आरोपीला रामटेकच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजा कुरई चांदणी चौक येथील रहिवासी श्याम नरेंद्र हिरकणे वय 25 वर्षे याने सिवनी मध्य प्रदेश येथील 24 वर्षे वयाच्या तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून रामटेक येथील मूनलाइट हॉटेल मध्ये आणून वारंवार शरीरसंबंध स्थापन केले. पीडितेने याबाबत 20/08/2018 रोजी मध्यप्रदेशातील कुरई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली सदर गुन्हा मध्यप्रदेश पोलिसांनी घटनास्थळ रामटेक असल्याने रामटेक पोलिसांना वर्ग केला पोलिसांनी याबाबत 30/08/2018 रोजी भारतीय दंडविधानाच्या 376 कलमाखाली अपराध क्रमांक 481/2018 नोंदविला. या दरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार वैरागडे त्यांचे सहकारी पोलीस शिपाई अतुल बांते, मनीष सुखदेवे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या प्रकरणातील आरोपी यास 07/10/2018 रोजी तिरोडा तालुक्यातील नागझिरा हॉटेल येथे स्वयंपाकी चे काम करीत असलेल्या श्याम नरेंद्र हिरकणे यास अटक केली. न्यायालयाने आरोपीस 10 ऑक्टोबर 2018 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक वंजारी यांचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक वैरागडे करीत आहे.

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१८

गडमंदिर रामटेकच्या आर्थिक व्यवहाराचे आठ वर्षांपासून ऑडिटच नाही

गडमंदिर रामटेकच्या आर्थिक व्यवहाराचे आठ वर्षांपासून ऑडिटच नाही

  धक्कादायक वृत्त 


रामटेक /तालुका प्रतिनिधी:
रामटेकच्या गडावर भोसला देवस्थान हे विदर्भातील अतिप्राचीन देवस्थान असून या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचे व अन्य मंदिरे आहेत.अतिशय पुरातन असलेल्या या मंदिराच्या मालकी संबंधी माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे प्रकरण सुरू आहे. त्यानुषंगाने या मंदिराचा कारभार बघण्यासाठी न्यायालयाने रिसिवर म्हणून रामटेकचे उपविभागीय अधिकारी (राजस्व)यांची नियुक्ती केलेली आहे.राम मंदिरात करोडो करोडो रुपयांची संपत्ती आहे.गड मंदिराची शेकडो एकर शेती आहे.शेती व मंदिरात असलेल्या दानपेट्या व देणगी याद्वारे देवस्थानला दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न मीळते. गेल्या 2010 पासून या मंदिराच्या व्यवहारांचे ऑडिट झाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
याबाबत रामटेकच्या रामभक्तांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 2 जुलै 2018 रोजी विशेष अर्ज लिहून ऑडिट करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी यांनी याबाबत कारवाई करण्यासाठी हा अर्ज सहायक धर्मादाय आयुक्त नागपूर यांचेकडे दिनांक 19 जुलै रोजी पाठविलेला आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयातून याबाबत कुठलेही प्रकारचे कार्यवाही अद्याप झालेली नाही. विशेष बाब अशी की या देवस्थानचा आर्थिक कारभार सांभाळणारे निरीक्षण अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांनी देवस्थानात बर्याच आर्थिक भानगडी केल्याचे बोलले जाते.रामटेकचे तत्कालीन ऊपविभागिय पोलीस अधिकारी डा.दिपक साळुंके या देवस्थानचे रिसीवर होते.त्यांच्या या चार वर्षांचे कार्यकाळातील रोकड पुस्तक लिहिलेले नाही अशीही माहिती आहे.या सर्व बाबींची चौकशी तत्कालीन रिसिवर राम जोशी यांनी केली. वर्षभराच्या चौकशीनंतर त्यांच्या बडतर्फीचे आदेशही त्यांनी काढले मात्र अद्यापही बावनकर कामावरच असल्याचे दिसून येते. राम मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी रामटेकातील राम भक्तांनी केली आहे.
निरीक्षक अधिकारी बावनकर यांना बडतर्फ केल्यानंतर त्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी रामटेक चे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व रिसीवर राम जोशी यांनी तशी जाहिरात काढून अनेकांचे अर्ज मागवले प्रत्यक्ष मुलाखती घेऊन यापैकी अतुल पोटभरे यांची या पदावर नियुक्ती केल्याचे समजते. मात्र त्या पदाचे नियुक्तीपत्र अद्याप देण्यात आलेले नाही.एकूणच रामटेक गड मंदिराचा कारभार भोंगळ पणे सुरु असून याकडे माननीय उच्च न्यायालयाने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान राम जोशी यांची बदली झाली आहे व रामटेक येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे हे आता रामटेकच्या गड मंदिराचे रिसीवर आहेत.या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याकडे रामटेक वासियांचे लक्ष लागले आहे.

रविवार, जुलै २९, २०१८

रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी

रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी

रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):


 रामटेक शहरात व परीसरात मागिल चार पाच दिवसापासुन मोठाप्रमाणात चोरीच्यां घटना होत अाहे. गडमंदिर परीसरातील जवळपास पन्नास दुकानाची चोरी या चार दिवसात झाली असुन. शनिवारच्या मध्यराञी पुन्हा अंबाळा तिर्थक्षेञ येथे
दहा दुकानात चोरी एकूण १८,४५० रुपये रोख  रक्कमेची चोरी केली.घटनेची माहीती मिळताच माजी आमदार अाशिष जयस्वाल व नगरसेवक सुमित कोठारी यांनी घटना स्थळी भेट दिली.
१) रमाबाई सुखदेव गलबले - ४,०००
२ ) शालु रामभाउ आगाशे ५,००० 
३ ) राजेश सुखदेव गलबले - ६५०
४ ) अकुंश रामराव कठौते -२५०
५ ) बबन छोटु भारती - १८००
६ ) बबीता विरसिंग पवार - ६००
७ ) प्रमोद प्रभाकर वाघ - ४५००
८ ) विजय राजाराम कोहळे - १५०
९ ) चंदन लक्ष्मण चौव्हान - १००० 
१०) गिता जगतसिंग कछवा यांच्या दुकानातील लाॅक तोडले  या प्रकरणी  ३७९ अन्वेय गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरिक्षक दिपक वंजारी पी.एस.आय.मुत्येपोड,पी.एस.आय . सरकटे पुढिल तपास करीत अाहे.                                          

मंगळवार, जुलै १७, २०१८

 गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू

गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू

रामटेक/प्रतिनिधी -
 पेंच व्याघ्र प्रकल्पामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 वर चोरबाहुली जवळ पेंच व्याघ्र प्रकल्प वन कक्ष क्रमांक ५९० मध्ये राष्ट्रीय महामार्ग वरुन रोड ओंलाडुन जात असतांना पहाटे साडे चार वाजता चा सुमारास अज्ञात भरधाव गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू सदर घटनेची माहीती मिळताच.पेंच व्याघ्र प्रकल्प वन क्षेञ अधिकारी पाडुरंग पाखले पुढील तपास करीत अाहे .


बुधवार, जुलै ०४, २०१८

ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल

ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल

रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):
शहरातील गांधी चौक येथिल स्टेट बॅक अाॅफ इंडीया येथे खातेदार लोकेश शरणागंत रा. डोंगरी हा ए.टी.एम.मध्ये दिनांक ०३ /०७/२०१८ दुपारी १२ वाजताच्या सुमारास पैसे काढण्याकरीता गेला असता त्यांला अपरिचित युवकांनी त्यांचा ए.टी.एम कार्ड बदल केला. सदर आरोपी हे ए.टी.एम. सी.सी.टी.व्ही कॅमेरा कैद झाले अाहे . जाभंळा शर्ट घातलेला व त्यांचे मागे निळे पांढरे पट्टे
असलेला शर्ट घातलेल्या मजबूत बांधा असलेली अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे ए.टी.एम कार्ड बदलुन त्यास चुकीचे ए.टी.एम.कार्ड देऊन फीर्यादीचा अकाउंट मधुन १५०००/- रू.काढुन फसवणूक केली. फिर्यादी लोकेश शरणागंत यांचा तक्रारी वरुन अज्ञात अारोपी विरोधात पोलीस स्टेशन येथे कलम ४२० भा.द.वी. अन्वेय गुन्हा दाखल करण्यात अाला असुन पुढिल तपास पी. आय. दिपक वंजारी करीत आहे.