Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ११, २०१८

३१ लाखाची दारू सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी केली जप्त

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन तब्बल तीन वर्षे तीन महिने झाले. असे असले तरी मात्र जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आताही अनेक छुप्या व अवैध पद्धतीने दारू आणून विकली जात आहे,शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका ट्रकमध्ये तब्बल ३५० पेट्या अवैध दारू वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या पथकाने या ट्रक क्रमांक MH 34 M 6396 ट्रकचा पाठलाग केला व ट्रक जप्त केला.हा पाठलाग काही साधा सुधा नसून एखाद्या सिनेमाच्या चोर पोलिसाच्या पाठ्लागासारखा होता.भर पावसात रात्री १२ वाजता रामनगर पोलिसांना या ट्रक चालकाने चकमा देत शहरातील सावरकर चौक ते वारोरा नाका पुलीया,पत्रकार भवन चौक ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक, प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक ते सपना टॉकीज मार्गे पोलिसांना पाठलाग करत थेट रेल्वे स्टेशन परिसरात धावायला लावले.यात पोलिसांची गाडीवरील सायरन सुरु असल्याने  उपस्थितांचे लक्ष या घटनेकडे गेले, हा ट्रक रेल्वेस्टेशन परिसरातील एका खड्यात फसला.
आणि ३५० पेट्या दारूचा ट्रक पकडण्यात रामनगर पोलिसांना यश आले.यात १५६ खोके १६६०० निपा देशी दारू(टॅंगो) किंमत ११,४०,०००, ११४ खोके ११४०० निपा देशी दारू (संत्रा) किंमत ४,२४,८०० ,३० खोके १४१६  मॅकडॉल किंमत १,००,८००, १४ खोके ३३६  कॅन बिअर किंमत १५,००,००० व मुद्देमालासोबत ऐकून ५०,३०,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यात आणखी काही बडे मासे अडकण्याची शक्यता पोलीस विभागाकडून व्यक्त केली जात आहे.यात कोणाचेही नाव सध्यातरी समोर आले नसून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे. 
अवैध पणे दारू वाहतूक करीत असतांना पोलिसांच्या हाती न लागण्यासाठी ट्रकचालकाने वाहन चालविण्याचे सर्व नियम धाब्याबर बसविले. व सुसाट गाडी रोडवर पळवीत राहिला.रात्रीची वेळ व पाऊस सुरु असल्याने रोडवर तितकी गर्दी नव्हती मात्र  ने  त्याच वेळीस जर पाऊस नसता तर ५-५० लोकांना या ट्रकचालकाणे नक्कीच चिरडले असते हे मात्र नक्की.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.