Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पोलीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१८

 चंद्रपूर मे शराब तस्करी के 6 आरोपियों को 3 वर्ष की कैद

चंद्रपूर मे शराब तस्करी के 6 आरोपियों को 3 वर्ष की कैद

चंद्रपूर/संवाददाता:
कोर्ट निर्णय साठी इमेज परिणाम
 चंद्रपुर जिले में शराबबंदी के बावजूद शराब की तस्करी करने वाले 6 आरोपियों को चिमूर न्यायालय ने 3-3 वर्ष कैद और 25-25 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई. 1 अप्रैल 2015 से चंद्रपुर जिले में संपूर्ण शराबबंदी की घोषणा की गई. इसके बावजूद शराब तस्कर अनेक हथकंडे अपनाकर शराब की तस्करी कर रहे हैं. 16 अप्रैल 2017 को तत्कालीन थानेदार दिनेश लबडे को गुप्त सूचना मिली थी कि शराब लाई जा रही है. इस आधार पर थानेदार ने सुधाकर माकोड़े, किशोर बोढे, राजू बावने, प्रवीण तिराणकर, शंकर उरकुड़े के साथ योजना बनाकर कार्रवाई की. जिसमें सेंट्रो कार क्र. एमएच-31 बीबी-5109 से विदेशी कम्पनी की 144 बोतल तथा संयज साठोने के घर से आफिसर च्वाइस कम्पनी की 288 बोतल शराब जब्त की थी.
कार्रवाई में पुलिस ने कुल 3,73,100 रुपए का माल जब्त कर चिमूर निवासी इब्राहिम युसूफ शेख, संजय साठोने, सोमेश्वर साठोने, और नागपुर निवासी राहुल शिमले, अमोल राऊत, तुषार बेतवार को धर दबोचा. चिमूर पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर न्यायालय में चार्जशीट दाखिल की. न्यायाधीश एस.एस. छलानी ने गवाहों के बयान और सबूत के आधार पर संजय साठोने ,सोमेशवर साठोने इब्राहिम शेख, राहुल शिमले, अमोल राऊत, तुषार बेतवार को 3-3 वर्ष कैद और 25-25 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई है. जुर्माना नहीं भरने पर 6 महीने अतिरिक्त सजा का प्रावधान रखा है. इसके पूर्व सुरेश खोब्रागड़े, प्रमोद खोब्रागड़े, राजकुमार चाचरकर, राजू झाड़े, अविनाश पोईनकर को भी न्यायालय ने सजा सुनाई थी. सामूहिक शराब तस्करी मामले में न्यायालय ने पहली बार सजा सुनाई है.

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८

नागपूर पोलिसांची बॉलीवूड स्टाईल जनजागृती;मिम्स पे चर्चा

नागपूर पोलिसांची बॉलीवूड स्टाईल जनजागृती;मिम्स पे चर्चा

नागपूर/ललित लांजेवार:
नागपूरकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर नागपूरकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. त्यासाठी नागपूर पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली असून शहरातील विविध चौकात वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे बॉलीवूड स्टाईल अंदाजात जनजागृतीपर अंदाजात फ्लेक्स लावण्यात आले आहे.

दिवसेंदिवस नागपूरची वाढती वाहनांची संख्या व नियमांचे पालन न केल्याने अपघातात होणारी वाढ रोखण्यासाठी नागपूर पोलीस त्यांच्या अनोख्या सध्या जनजागृतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नागपूर पोलिसांची चर्चा व्हायलाच पाहिजे त्याला कारणही तसेच आहे.नागपूरकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर नागपूरकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. 

त्यासाठी नागपूर पोलिसांनी अमिताभ बच्चन यांचा कोण बनेगा करोडपती, १९७५ साली प्रदर्शित झालेला भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट शोले,सलमान खान,अमीर खान,अमरीश पुरी, बोमन इराणी,यांच्या सह फिल्म इंडस्ट्री मधील अनेक चित्रपटांच्या मनावर कोरणाऱ्या डॉयलॉगचा वापर करत जनजागृती करत आहेत, तर सोशल मिडीयावर या जनजागृतीचे मिम्स देखील व्हायरल केले आहे.



विना हेल्मेट गाडी चालवणे,ट्रिपल सीट वाहन चालवणे,अवैध प्रवासी वाहतूक, राँग साईड ड्रायव्हिंग, फॅन्सी नंबर,सिटबेल्ट न लावता वाहन चालविणे, अश्या आशयाचे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील फोटो व डॉयलॉग वापरून नागपूर पोलीस नागपूरकरांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर पोलिस सोशल मिडिया वरून फेसबुक व ट्वीटरच्या माध्यमातून हि जनजागृती तर करतच आहेत.

 सोबतच शहरातील चौकाचौकात फ्लेक्सच्या माध्यमातून देखील हि जनजागृती करत आहे.सध्या असे अनेक मिम सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकजण ह्या ट्वीटकडे उत्सुकतेने पाहत आहेत. तर अशा प्रकारचे ट्वीट विनोदी ढंगाने करून नागरिकांपर्यंत पोहचवत असते त्यात ह्या ट्वीटवरून नागपूर पोलीस हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहे.

पोलिसांच्या अश्या नवीन संकल्पनेसह जरी जनजागृती जरी सुरु असली तरी मात्र शहरात अनेक ठिकाणी मोठ मोठ्या आवाजाच्या गाड्या कर्ण कर्कश आवाजाचे हॉर्न,व दुचाकीने गाडी हवेत उडविण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणवर सुरूच आहे. अश्या या प्रकाराला पोलिसांनी लवकरात लवकर आळा घालणे गरजेचे आहे,

शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

 चंद्रपूर पोलिसांकडून १४ दारू तस्करांना हद्दपार करण्याचे आदेश

चंद्रपूर पोलिसांकडून १४ दारू तस्करांना हद्दपार करण्याचे आदेश

Image result for हद्दपार आरोपीचंद्रपूर/प्रतिनिधी:
गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ जणांना आरोपींना जिल्ह्यातून  हद्दपार करण्याचे आदेश   दिले आहे. 
चंद्रपूर पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी चंद्रपूर यांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
  कलम 56, ५७ मुंबई पोलीस कायदा अन्वये हे आदेश पारीत करण्यात आले आहे. 
गणेशोत्सव कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, याकरीता गणेश विसर्जनापासून पुढील सहा महिने व तीन महिने कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
यात दिपक उर्फ रिंकु कोमल चव्हाण वय 19 वर्ष रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारशाह यास दि. 07/12/17 अन्वये 01 वर्षकरीता हददपार,
 पोलीस स्टेषन गोंडपिंपरी येथील काशीनाथ सदाशीव पोटे वय 32 वर्ष रा.मक्ता ता गोंडपिंपरी जि. चंद्रपुर यास दि. 12/04/18 अन्वये 06 महिने करीता,
गोंडपिंपरी लगतचे 06 तालुक्यातुन हद्दपार,पोलीस स्टेशन चिमुर होमराज मारोती गोसवाडे वय 27 वर्ष रा. मालेवाडा ता. चिमुर जि. चंद्रपुर यास दि. 16/05/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
 पोलीस स्टेशन सावली येथील श्रीनिवास रामदास पुल्लुरवार वय 42 वर्ष रा. लोंढोली ता. सावली जि. चंद्रपुर यास दि. 14/08/18 अन्वये ०३ महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील गौतम तुळशीराम लोणारे वय 32 वर्ष रा. नलेस्वर मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर यास दि. 23/08/18 अन्वये 04 महिने करीता हददपार, 
 पोलीस स्टेशन चिमुर प्रशांत जनार्दन शामकुळे वय 34  वर्ष रा. खडसंगी ता. चिमुर जि. चंद्रपुर यास दि. 06/09/18 अन्वये 04 महिने करीता हददपार, 
 पोलीस स्टेशन बल्लारशाह अब्दुल रशीद अब्दुल गफ्फार कुरेशी वय ४३ वर्ष रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारशाह यास दि. 06/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील आवेश शब्बीर कुरेशी वय 32 वर्ष रा. भंगाराम भिवापुर वार्ड चंद्रपुर यास दि. 15/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अनिल रामचंद्र जाफराबादी वय 35 वर्ष रा. गोपालपुरी वार्ड चंद्रपूर यास दि. 15/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार, 
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर कुणाल यशवंत गर्गेलवार वय रा. विट्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर यास दि. 14/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर छोटु उर्फ नितीन शंकर गोवर्धन वय 35 वर्ष रा. महात्मा फुले चौक बाबुपेठ वार्ड चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोस्टे चंद्रपुर शहर लव नरसिंग रेड्डी रा. अश्टभुजा वार्ड वय 25 वर्ष चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 03 महिने  करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर शुभम अमर समुद रा. पंचशील चौक घुटकाला वार्ड चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार, 
पोलीस स्टेशन रामनगर येथील यावर अली शेरू अली वय 26 वर्ष रा. जलनगर वार्ड चंद्रपूर दि. 17/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांचे मार्ग मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री. सुधाकर अंभोरे,पोनि श्री. गोपाल भारती यांनी केली.
 



लंडनची नोकरी सोडून बनले आयपीएस अधिकारी

लंडनची नोकरी सोडून बनले आयपीएस अधिकारी


देशासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने हर्ष पोद्दार यांना लंडनमधील लॉ फर्मची कॉर्पोरेट वकीलीची नोकरी सोडून भारतात नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यास भाग पाडले.


पोलीस, हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येताच कधी आपण घाबरतो तर कधी पोलिसांच्या कामगिरीमुळे आपलं उर अभिमानाने भरून येतं. आज आपल्या देशाची बाह्य सीमा सैनिकांमुळे जर सुरक्षित असेल तर देशाच्या अंतर्गत सीमेची सुरक्षा पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे सुरक्षित आहे. आज पोलीसांसमोर नक्षलवाद, सायबर सुरक्षा, जातीय दंगली, बालगुन्हेगारी असे अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. भारतीय पोलीस सेवेमधील अधिकारी या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी समर्थ आहेत. आज आपण अशाच एका अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने पोलीस हा कायदा व सुव्यवस्था यांच्यापुरता मर्यादित न ठेवता अनेक समाजोपयोगी उपक्रमांमधून पोलिसांना समोर आणलं व पोलीसिंग हे फक्त पोलिसांच काम नसून त्यामध्ये जनतेला सुद्धा सहभागी करून घेतलं. ही गोष्ट आहे मालेगावचे अपर पोलीस अधिक्षक आयपीएस हर्ष पोद्दार यांची.
 

 
आयपीएस हर्ष पोद्दार मुळचे कोलकत्ताचे व कायद्याचे पदवीधर. नॅशनल लॉ स्कूल कोलकत्ता मधून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठामधून आंतरराष्ट्रीय व घटनात्मक कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. यानंतर काही काळ ते लंडनमधील क्लीफर्ड चान्स या लॉ फर्ममध्ये कॉर्पोरेट वकील म्हणून काम करत होते. परंतु काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना. जिथे देशाची धोरणे ठरली जातात अशा क्षेत्रात किंवा संस्थेत त्यांना काम करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी २०१० मध्ये लंडन सोडण्याचा निर्णय घेतला व भारतामध्ये येऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरु केली.

हर्ष पोद्दार यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली व त्यांची निवड भारतीय राजस्व सेवेसाठी झाली. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली व दुसऱ्या वेळी ३६१ रँक प्राप्त करून त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेमध्ये झाली.


हर्ष पोद्दार यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली व त्यांची निवड भारतीय राजस्व सेवेसाठी झाली. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली व दुसऱ्या वेळी ३६१ रँक प्राप्त करून त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेमध्ये झाली.
 
 ष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अंध मुलांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली, ज्यामध्ये मुलांना छोटया गटांमध्ये विभागून त्यांना अपंगत्वावर एक कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितला. आयपीएस हर्ष पोद्दार यांच्या लक्षात आले की जर मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले तर सखोल परीक्षणासाठी त्यांना प्रेरित केले जाऊ शकते व त्यांची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून काम केले जाऊ शकते. हीच पद्धत त्यांनी आपल्या पहिल्या नियुक्तीदरम्यान अवलंबली. त्यांची पहिली नियुक्ती ही औरंगाबाद ज़िल्ह्यामध्ये वैजापूर या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून झाली.

आपण जर बालगुन्हेगारीचे आकडे बघितले तर महाराष्ट्र हा भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे जिथे बालगुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी ही अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे. याच संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यात सुधारणा होण्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्यांची मतं मागितली. त्यात हर्ष पोद्दार यांनी युवा संसद स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो स्वीकारला गेला. युवा संसद हा एक असा मंच आहे जिथे शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना गुन्हेगारी संबंधित एक विषय दिला जातो आणि त्या विषयाशी संबंधित त्यांच्याकडून सूचना मागवल्या जातात, की जर ते सरकार मध्ये असते तर त्यांनी तो विषय कशा प्रकारे हाताळला असता. आयपीएस हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचा “पायलट प्रोजेक्ट” औरंगाबाद मधील नाथ व्हॅली स्कूल व औरंगाबाद पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आला. वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी यासारखे विषय देण्यात आले. प्रत्येक टीमला पोलीस, सरकार व सामान्य माणूस म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या व टीम मधील एकाला दिल्या गेलेल्या विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली. स्पर्धा यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात ही स्पर्धा घेण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला. प्रथम ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या परिक्षेत्रात घेण्यात आली व यावर्षी नाशिक परिक्षेत्रामध्ये सुद्धा या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. याच कामासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला. आतापर्यंत ४२००० पेक्षा जास्त युवक-युवती या अभियानाशी जोडले गेले आहेत.

 
बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं की लोक नाक मुरडतात किंवा जाण्याचं टाळतात त्यामागे भीती हे तर एक मुख्य कारण आहेच परंतु पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळेलंच याची नसलेली खात्री. याचा अभ्यास करता हर्ष पोद्दार यांच्या असं लक्षात आलं की काळानुसार पोलिसांनासुद्धा बदलण्याची गरज आहे म्हणून त्यांनी पोलीस इमारती व पोलिसांच्या वागणुकीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामधील वीरगाव व शिऊर पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकन प्राप्त झाले. कोल्हापूर मधील करवीर विभागात सात पोलीस स्टेशन तसेच नाशिक मधील मालेगाव विभागात चार पोलीस स्टेशन,अपर पोलीस अधिक्षक कार्यालय व मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांना आयएसओ नामांकन प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. यामुळे पोलिसांकडे बघण्याचा सामान्य जनतेचा दृष्टिकोन बदलला व लोक आपली भीती बाजूला ठेवून आपल्या समस्या सांगू लागले व त्याचं निराकरण सुद्धा योग्य रितीने होऊ लागलं.

औरंगाबाद मधील वैजापूर व कोल्हापूर मधील करवीर येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती नाशिक मधील मालेगाव येथे अपर पोलीस अधिक्षक या पदावर झाली. मालेगाव हे शहर अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. २००१ साली झालेल्या दंगली तसेच २००६ व २००८ मध्ये झालेले बॉम्बस्फोट व त्यानंतर उसळलेल्या दंगली, याच दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले करण्यात आले, या सगळ्यांमुळे तिथे बरेच अधिकारी जाण्याचं नाकारतात. परंतु हर्ष पोद्दार यांनी ही नियुक्ती आव्हान म्हणून स्वीकारली. गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी विविध समाजोपयोगी प्रकल्प मालेगावमध्ये राबवले. उडान सारखा प्रकल्प असेल ज्यामध्ये मालेगाव मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल व इतरही परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले जाते. आपण जर मालेगाव मधील गुन्हेगारीचा अभ्यास केला तर त्यामध्ये तरुणांचं प्रमाण अधिक आहे.
१५ ते २५ या वयोगटातले तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढल्या गेले आहेत. कोणत्याही प्रकारच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर नसल्यामुळे ते गुन्हेगारीचा मार्ग पकडतात. अशा वेळी उडान सारखा प्रकल्प त्यांना एक दिशा देण्याचं काम करत. मालेगाव मॅरेथॉन सारखा आणखी एक प्रकल्प जिथे संपूर्ण मालेगावकर आपल्या सर्व जाती-धर्म विसरून मालेगावच्या एकता, सुरक्षा व शांतीसाठी धावले. यासारख्या उपक्रमामुळे जाती धर्म विरहित वातावरण मालेगावमधे निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या द्वारे दंगली घडवण्यासाठी पैसा पुरवला जातो किंवा जिथून दंगली घडतात अशा गोष्टींना पायबंद घालण्यात आला. मागील वर्षभरात अवैध व्यापार ज्यामध्ये दारू, जुगार, मटका, देहव्यापार, गोहत्या या गोष्टींवरती छापा टाकून त्यांना प्रतिबंध घालण्यात आला. मागील ११ महिन्यात ३ करोडचा माल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. यामुळे मागील वर्षभरात गणपती उत्सव, ईद, नवरात्रोत्सव जे हिंदू-मुस्लिम धर्माचे सण आहेत ते अतिशय शांत वातावरणात पार पडले. कोणताही अनुचीत प्रकार किंवा जातीय तणाव मालेगाव मध्ये तयार झाला नाही.
 
मागच्या वर्षभरात देशामध्ये बरेच जातीय तणाव तयार होण्याचे प्रकार घडले, ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल किंबहुना काही ठिकाणी तर दोन समाजामध्ये दंगली पण झाल्या. भीमा कोरेगाव व औरंगाबाद हे त्यामागील काही उदाहरणे. परंतु अशा तणावपूर्ण स्थितीमध्ये सुद्धा असंवेदनशील म्हणवणाऱ्या मालेगावमध्ये कोणताही वाईट प्रकार घडला नाही आणि या सगळ्या वेळी मालेगाव शांत राहिलं. याच ताज उदाहरण द्यायचं झाल्यास नुकतंच धुळे जिल्ह्यामधील राईनपाडा या गावी मुलं चोरणारी टोळी आली या अफवेतून पाच जणांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्याच रात्री मालेगाव मध्ये सुद्धा असाच प्रसंग निर्माण झाला. त्याच अफवेचे शिकार परभणी जिल्ह्यातील काही लोक झाले. त्यांच्याकडचे पैसे संपल्यामुळे भिक्षा मागून ते आपल्या गावी परत जाणार होते. परंतु मुल चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने मारहाण करायला सुरुवात केली. ही बातमी मालेगाव मध्ये पसरली व छोट्याशा असणाऱ्या जमावाने रुद्ररूप धारण केले.

जवळपास २००० लोक तिथे जमा झाले व त्या लोकांना आमच्या ताब्यात द्या अशी घोषणा करू लागले. मालेगाव मधील काही समजूतदार लोकांनी शहाणपण दाखवत त्या पीडित कुटुंबाला आपल्या घरात आसरा दिला व आयपीएस हर्ष पोद्दार यांच्याकडे मदतीची विनंती केली. हर्ष पोद्दार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले व स्वतःसुद्धा आपल्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी धाव घेतली. परंतु परिस्तिथी इतकी बिघडली की घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या गाड्या जमावाने उलथवून लावल्या, त्यामुळे लाठीचार्जचे आदेश देऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला व पीडित कुटुंबाला सुखरूपपणे जमावाच्या तावडीतून बाहेर काढण्यात आले. आयपीएस हर्ष पोद्दार व त्यांच्या टीमने परिस्थिती संयमीपणे हाताळल्याने तिथे कोणताही मोठा उद्रेक झाला नाही आणि राईनपाड्याची पुनरावृत्ती टळली. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान व धाडसासाठी ते अभिनंदनास नक्कीच पात्र ठरतात.
 

 
हर्ष पोद्दार यांनी पोलीस हा फक्त कायदा व सुव्यवस्था यांच्यापुरता न ठेवता अनेक समाजोपयोगी प्रकल्पांमधून पोलिसांना जनतेसमोर सादर करण्याचं बहुमूल्य काम केल आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे तर पोलिसांचे काम आहेच परंतु त्यामध्ये जनतेच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव समाजाला वेळोवेळी करून देण्याचं काम आयपीएस हर्ष पोद्दार करत आहेत. आपण खूप नशीबवान आहोत कारण आपल्या सुरक्षेची जबाबदारी हर्ष पोद्दार यांच्या सारख्या आश्वासक व लोकाभिमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन व त्याची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा वाईट प्रवृत्तींविरोधात उभे राहू अशी शपथ घेतली पाहिजे.

गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८

चंद्रपुर गणेश विसर्जन मिरवणुक; वाहतुक अधिसुचना जारी

चंद्रपुर गणेश विसर्जन मिरवणुक; वाहतुक अधिसुचना जारी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक 23/09/2018 ला सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असल्याने शहरातील रहदारीला अडथळा होवुन जनतेला त्रास होवु नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(ब) नुसार चंद्रपुर शहरातील रहदारीचा मार्ग दिनांक 23/09/2018 चे सकाळी 06ः00 वाजता पासुन ते दिनांक 24/09/2018 चे पहाटे 06ः00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी खालील प्रमाणे वळविण्याचे निर्देषीत करण्यात आले आहे. 

* गणेश विसर्जन मिरवणुक सोहळा पार पडेपर्यत सावरकर चौक-एसटी स्टॅड-प्रियदर्शनी चौक ते कस्तुरबा चाकै मार्गे गांधी चौक तसेच पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट मार्गे चौक ते जुना वरोरा नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे.
Image result for गणपती विसर्जन वाहतूक व्यवस्था
संग्रहित
* नागपूर रोडने येऊन बल्लारशाह किंवा मुल कडे जाणारी सर्व प्रकारची वाहने हे प्रियदर्शनी चौक कडे जाण्यास बंदी असल्यांने सर्व प्रकारची वाहने ही जुना वरोरा नाका- बेलेवाडी जुना उड्डान पुल- सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाहकडे जातील. 

* त्याचप्रमाणे मुल किंवा बल्लारशाह कडुन नागपूर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प-सावरकर चौक नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूर कडे जातील.

*नागपूर कडुन शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळुन) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जावयाचे असल्यास जुना वरोरा नाका चाकैातुन उजवीकडे वळण घेऊन रामनगर- संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कुल-सवारी बंगला चौक-नगीनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.

* चंद्रपुर शहर पोस्ट हद्दीतील रहिवाश्यानी नागपुर,वणी,घुग्घुस,गडचांदुर कडे जाणाऱ्या प्रवाश्यांनी रहमत नगर, नगीना बाग व इतर परीसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट रहमेत नगर,दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. 
Image result for विसर्जन चंद्रपूर
संग्रहित 
* बल्लारशाह व मुल कडुन येणारी वाहने (जड वाहने वगळुन) शहरामध्ये जावयाचे असल्यास बसस्टॅड-एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पॅम्प कडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेट पर्यंत प्रवेश करता येईल.

गणेश विसर्जन मिरवणुक सोहळया दरम्यान खालील 
ठिकानी नो-पार्किंग व नो- हॉकर्स झोन म्हणुन घोशीत करण्यात येत आहे.

Image result for वाहतूक पोलीस चंद्रपूर1.जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक पर्यंत 

2.जटपुरा गेट ते रामाळा तलाव पर्यंत 

3.जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक पर्यंत 

4.जटपुरा गेट ते दवा बाजार चौक पर्यंत

5.कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत च

6.कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट पर्यंत 

7.गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देउळ पर्यंत 

8. कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक 

9.दस्तगीर चौक ते मिलन चौक 

10.मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज 

11.हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स पर्यंत 

12.मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज 

13.छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीर उपरोक्त नमुद मार्गावर नो-पार्किंग व नो-हॉकर्स झोन म्हणुन घाशीत केल्याने मिरवणुक व वाहतुक मार्गावर नागरीकांनी, व्यवसायीकांनी तसचे गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग/उभी करु नये. मिरवणुक मार्गालगतच्या ज्या रहिवास्यांना आपली वाहने पार्किंग स्थळी उभी करावयाची आहते. त्यांना महानगरपालीकेच्या पार्किंग स्थळी 

1) जुबली हायस्कुलचे पटांगण

Image result for वाहतूक पोलीस चंद्रपूर2) महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किग या ठिकानी उभी करता येतील. परंतु मिरवणुक संपल्यानतंरच ती वाहने तेथुन काढता येतील. त्याचप्रमाणे चंद्रपुर शहरात मोठया प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन साहेळा दरम्यान शहरातील व इतर ग्रामीण भागातुन नागरीक हा साहेळा पाहण्यासाठी येत असतात दरम्यान शहरात वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन नागरीकांना खालील प्रमाणे पार्किगं झोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 

 पार्किंग झोन खालील प्रमाने घोषित करण्यात आले आहे.

1. चांदा क्लब ग्राउंड

2. डॉ. बाबासाहबे आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका 

3. सेंट मायकल हायस्कुल, नगीना बाग

4. सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौका जवळ रामनगर

5. व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक 

6. डी.एड.कॉलेज ग्राउंउ बाबुपेठ


7. महाकाली मंदीर ग्राउंड, बागला चाकै ही ठिकाणे दिनांक 23/09/2018 चे सकाळी 07ः00 वाजता पासुन दिनांक 24/09/2018 चे सकाळी 06ः00 वाजपेर्यंत नागरीकांसाठी पार्किंग स्थळे म्हणुन घोशीत करण्यात आलेले आहते. 

नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता वरील पार्किगं स्थळी पार्क करावीत. दिनांक 23/09/2018 रोजी चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुक, देखाव्यासह गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यत मुख्यतः निघणार आहे. त्यासाठी देखावा पाहणाऱ्या नागरीकांना पोलीस प्रशासनातर्फे निर्देष देण्यात येते की, नागरिकांनी गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यत जाणाऱ्या लोकांची गर्दी लक्षात घेता सोयीच्या दृश्टीने जटपुरा गेट परिसर ते गांधी चौक परिसरांकडे जावयाचचे असल्यास गांधी चाकै ते जटपुरा गेट मार्गाचा वापर न करता जटपुरा गेट ते कस्तुरबा रोड किंवा शहरात असलेल्या गल्यांचा वापर करावा. जेणेकरून गांधी चाकै ते जटपुरा गेट कडे जाणाऱ्या नागरिकांसाठी रस्ता मोकळा राहील . जनतेने विसर्जन दरम्यान वरील वाहतुक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखणे कामी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.