Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ११, २०१८

विजेच्या खांबावरून पडून विज कर्मचारी जखमी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या विद्युत पोलवर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरु असतांना चंद्रपूर येथील एका कंत्राटी वीज कर्मचारी पोल्वरून पडून जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घुटकाळा वार्डातील नेहरू चौकात घडली. विनोद कुमरे असे या कंत्राटी कर्मचार्याचे नाव आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास घुटकाळा वार्डातील नेहरू चौकात महावितरणच्या  पोलवर  देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी विनोद कुमरे हा कर्मचारी चढला होता. मात्र सेफ्टी बेल्टचा दोर मजबूत नसल्याने तो जवळपास २५ फुटावरून खाली पडला यात त्याला गंभीर दुखापत झाली, त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिनी दिली.मिळालेल्या माहिती नुसार हा कर्मचारी महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत होता.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.