Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ११, २०१८

४ जुलैला नागपूर बंद

The closure of Nagpur on 4th July to protest the monsoon session | पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ ४ जुलैला नागपूर बंदनागपूर/प्रतिनिधी:
 स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन असो की, पावसाळी अधिवेशन, त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. धनंजय धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, राजकुमार नागुलवार, गोविंद भेंडारकर, माया चवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात विदर्भ विरोधी नेत्यांविरुद्ध ‘गो बॅक’चे होर्डिंग लावण्यात येतील. ४ जुलैनंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीची घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करून संघटनात्मक बांधणी केली जाईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अ‍ॅड. सुरेश वानखेडे, अ‍ॅड. टेकचंद कटरे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, विष्णूपंत आष्टीकर, अर्चना नंदघरे, दिगंबर डोंगरे, ताराबाई बारस्कर, रंजना मालपे, विजया धोटे, दीपक एम्बडवार, मुकेश मासुरकर, रियाज खान, डॉ. जी.एम. ख्वाजा, बाबा राठोड, कपिल इद्दे, भय्यालाल माकडे, प्रा. अनिल ठाकूरवार, नितीन भागवत, कृष्णराव भोंगाडे, दामोदर शर्मा, अ‍ॅड. अजय चमेडिया, रमेश नळे, अनंता येरणे, बंडू देठे, गुलाबराव धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या निवडणुकीत भाजपला हरवणार
बैठकीत भाजपाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आश्वासनावर विशेष चर्चा झाली. भाजपाने निवडणुकीपूर्वी आपले आश्वासन पाळले नाही, तर येत्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा सफाया करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भाजपासोबत काँग्रेसही विदर्भ विरोधी आहे, तेव्हा २०१९ च्या निवडणुकीसंबंधी तिसऱ्या पर्यायाचा विचार करण्यासाठी ११ सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा बैठकीत घेण्यात आला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.