लाकडे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे रमेश तलांडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे तर रामदास गोटेफोडे असे वनकर्मचारी चे नाव आहे.
तक्रारदार लाखनी येथील रहिवासी असून 1990पासून शेतातील लाकडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात त्यांनी नागभीड तालुक्यातील कांपा येथील शेतातील सागवानाची ६ झाडे विकत घेऊन कापणी केली सदर झाडे नागपूर येथे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना मिळविण्यासाठी ७ मे रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे यांच्याकडे अर्ज केला येथील लिपिक रामदास गोटेफोडे याने बदली वाहतूक परवाना देण्यासाठी स्वतःकरता १ हजार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी तलांडे यांच्यासाठी १ हजार असे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली रोजी केलेल्या पडतात आरोपी रमेश तलांडे आणि रामदास गोटेफोडे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली यावेळी त्यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली सदरची कारवाई पोलिस उपायुक्त पोलीस अधीक्षक आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी एम घुमे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे,कर्मचारी मनोहर एकोणकर,महेश मांढरे,अजय बागेसर,संतोष येलपूलवार,चालक दिनेश गरमडे यांनी केली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)