मुल येथून जवळच असेलेल्या औद्योगिक परिसरात शांतिकुंज सलवंट लिमिटेड आणि असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपनीला आज मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत दोन्ही कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले,५ तासांच्या अथक परिश्रमानंतर हि आग आटोक्यात आणल्या गेली. विशेष म्हणजे या दोन्ही कंपनीमध्ये मरेगांव हे गाव आहे. हि लागलेली भीषण आग वेळीच आटोक्यात आल्याने गाव वाचले त्यामुळे जीवितहानी टळली या दोन्ही कंपन्या सध्यस्थिती बंद अवस्थेत आहेत पण दोन्ही कंपन्यांमध्ये रसायन असल्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले होते. सध्या शेतात खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीचे कामे सुरूआहे.अश्यातच शेतातील काडीकचरा हा शेतकरी तणीस टाकून नष्ट करत असतो.त्यासाठी जवळच्या परिसरात आग होती व वाऱ्याच्या झोतात हि आग कंपनी परियंत आली आणि या दोन्ही कंपनीला आगीने वेढा घातला असे बोलल्या जात आहे.हि लागलेली आग भीषण असल्याने जवळील गावाला देखील खाली करण्याचे सांगण्यात आले होते.
हि आग विजवण्यासाठी चंद्रपूर-बल्लारपूर गडचिरोली आणि मूल येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात
आले अशी माहिती आहे. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. हिरे उपविभागीय अधिकारी खेडकर, राज्य विद्युत विभागाचे अभियंता होणाडे,पोलीस निरीक्षण चव्हाण, घटनास्थळी जातीने हजर होते.
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)