Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८

वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी;एकाला अटक

वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी;एकाला अटक

  गाडीत विशेष खप्पा तयार करून करण्यात येत होती दारू तस्करी 
                                   १० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर/प्रातिनिधी:
वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी करणाऱ्या दारू तस्कराला चंद्रपूर
 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक


चंद्रपूर येथील रयतवारी कॉलरी परिसरात करण्यात आली कारवाई
 रणजीत खरवार असे दारू तस्कराचे नाव  

 गुप्त माहितीच्या आधारे केली पोलिसांनी कारवाई 
 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे  यांच्या नेतृत्वात  सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, दौलत चालखुरे, कुंदन सिंग बावरी, प्रांजल झिलपे यांनी छापा टाकण्यात आला. 
  चालक रणजीत खरवार याला ताब्यात घेण्यात आले. तर दोघे पसार झालेत. 

यावेळी पोलिसांनी दारूसाठा, व वाहन असा एकूण दहा लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  
-------------------------------------------------------------------
शहर पोलीस कारवाई 
1400 नग देशी दारू किं अंदाजे 1, 40,000/- चा माल व एक मोपेड गाडी किं अंदाजे 30, 000/- असा एकूण 1,70,000/-  रु चा माल आरोपी नामे अक्षय देविदास बारस्कर वय 20 वर्ष रा. लालपेठ जुनी वस्ती चंद्रपूर  व इतर एका आरोपीस अटक 
Api देवेंद्र ठाकूर,  अमोल गिरडकर ड्राइवर रामटेके यांची कारवाई 


 नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत

नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत

नागपूर/प्रतिनिधी:


पैसे कमवायच्या लालसेपोटी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कुटुंबीयांपासून लपून धूम्रपान करणाऱ्या किंवा इतर व्यसन करणारे शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी या टोळीचे सूत्रधार हे विध्यार्थ्यांवर लपून लक्ष ठेवत होते आणि विध्यार्थी व्यसन करतांना दिसला कि त्याला उचलून टोळीच्या सूत्रधाराच्या घरी नेण्यात येत होते.२६ सप्टेंबरला आरोपींनी खंडणीसाठी अयोध्यानगर येथील रहिवासी हिमांशु सुनील कातरे याचे अपहरण केले.व त्याला दमदाटी करून मारहाण केली.आरोपींनी हिमांशुला अधिक पैशांची मागणी करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हिमांशुचे फोटो त्याच्या वडिलांना पाठवून खंडणी मागितली. हिमांशुने रक्कम आणून देण्याचे आश्वासन दिले. तेथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. 
दोन दिवसांपूर्वी हिंमत करून पीडित कुटुंबीयांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाचा खुलासा झाला. 
 भीतीपोटी कुणीच या टोळीविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखविली नसल्याने या टोळीतील सदस्यांचे चांगलेच फोफावत होते.त्यानंतर हिमांशु आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३६३, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून टोळीचा सूत्रधार बिट्टु, प्रज्ज्वल आणि फैजानला अटक केली. टोळीतील इतर सदस्य अद्यापही फरार आहेत.











शुक्रवार, जून २२, २०१८

देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला चंद्रपूरातून अटक

देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला चंद्रपूरातून अटक

दोन जिवंत काडतुसे जप्त
देशी कट्टा साठी इमेज परिणाम
संग्रहित छायाचित्र.
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात देशीकट्टा जवळ बाळगणाऱ्या एका युवकाला रामनगर आणि शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अटक केली. त्याच्याजवळून एक देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत़, इमरान फय्याज खान रा़.बी.एम.टी चौक रयतवारी कॉलरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे़.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रामनगरचे गुन्हे शोध पथक आणि सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक यांचे संयुक्त पथक तयार करून गुरुवारी संध्याकाळी ७़३० वाजता आरोपी  घइमरान फय्याज खान रा़.बी.एम.टी चौक रयतवारी कॉलरी  याच्या घरी धाड घालून घराची झडा झडाती घेतली़ यावेळी आरोपीच्या घरून देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय  पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक दिपक गोतमारे. शहर पोलीस निरीक्षक भगत.  उपनिरीक्षक कापडे, वाघमारे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद कोटनाके, सीटीचे पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़.

शुक्रवार, जून १५, २०१८

वर्ध्यात जेसीबी चोरट्याला अटक

वर्ध्यात जेसीबी चोरट्याला अटक

JCB robbery arrested | जेसीबी चोरट्याला अटकपुलगाव/प्रतिनिधी:
 जेसीबी पळविणाऱ्या चोरट्याला पुलगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून जेसीबीसह १२ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
९ जून रोजी मौजा रोहणा येथून जेसीबी कपंनीचा जेसीबी क्र. एमएच २९ व्ही ३९५७ हा मालक विजय टिकाराम उरकुडे (५४) रा. यवतमाळ यांच्याकडे कामावर असलेल्या हेल्पर मनीष दिलीप उईके (२९) रा. शिवाजी वॉर्ड आर्वी याने लबाडीने चोरून नेला. याबाबत उरकुडे यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात १२ जून रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली.
पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अशोक भोयर, अनिल भोवरे आणि तपास पथकाने तपासचक्र फिरवून आरोपी मनीष दिलीप उईके रा. शिवाजी वॉर्ड आर्वी याला नागपूर येथून ताब्यात घेतले. शिवाय त्याने चोरी केलेला जेसीबी क्र. एमएच २९ व्ही ३९५७ किंमत १२ लाख रुपये बुट्टीबोरी शिवारातून हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, जमादार अशोक भोयर, विवेक बन्सोड, पोलीस शिपाई अनिल भोवरे, विकास मुंडे, मुकेश वांदिले, राहुल साठे आदींनी केली.पुलगाव पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच जेसीबी आणि चोरटा शोधून काढल्याने मालकाला दिलासा मिळाला आहे.

सोमवार, जून ११, २०१८

चंद्रपुरात व्यापाऱ्याला तीस लाखांचा गंडा

चंद्रपुरात व्यापाऱ्याला तीस लाखांचा गंडा

आरोपी महिलेला बंगळूर येथून केली अटक:४१ लॅपटॉप जप्त
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नागपुरातील एका फायनान्स कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून चंद्रपुरातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीस लाखाने गंडा घालणाऱ्या एका महिलेला रामनगर पोलिसांनी बंगळूर येथून अटक केली आहे.
लक्ष्मी शंकर कोरवन रा़. पिपरबोडी ता़.भद्रावती असे अटकेतील महिलेचे नाव आहे़. लक्ष्मी ही पतीपासून विभक्त राहत असून, व्यावसायीकांशी ओळख निर्माण करणे आणि ओळखीचा फायदा घेत त्याला गडविणे असा तिचा व्यवसाय होता.अशी माहिती पोलिसांनी दिली.अशाच एका ओळखीतून तिचा संपर्क चंद्रपूर येथील व्यापाऱ्याशी आला आणि तिने टाटा कॅपिटल फायनान्स नागपूर या कंपनीचे बनापट कागदपत्र तयार करून, या फायनान्समधून आपल्याला ५० लाखांचे कर्ज मंजूर झाले असून, मला तातडीच्या कामासाठी ३० लाखांची गरज आहे कर्जाची रक्कम मिळताच आपण तीस लाख परत करू असे सांगत तिने एका व्यापाऱ्याला  २०१६ मध्ये तीस लाख रुपये मागितले. त्या व्यापाऱ्याने  देखील ३० लाख दिले, मात्र बरेच महिने लोटल्यानंतरही तिने पैसे परत केले नाही यानंतर व्यापाऱ्याने दिलेल्या रकमेबाबत तिला विचारणा सुरू केली यावेळी ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. 
व्यापाऱ्याला संशय आल्याने त्याने टाटा कॅपिटल फायनान्स येथे चौकशी केल्यानंतर लक्ष्मी कोरवन या महिलेला असे कोणतेही कर्ज मंजूर झाले नाही, अशी माहिती मिळाली तर, लक्ष्मी कोरवन हिच्याकडे संबंधित कंपनीचे बनावट कागदपत्र असल्याने कंपनीने रामनगर पोलीस ठाण्यात लक्ष्मीविरुद्ध मार्च महिन्यात तक्रार दिली होती.पंरतु लक्ष्मी कोरवन ही बेंगळूरु येथे फरार झाली होती दरम्यान, लक्ष्मीच्या शोधात असलेल्या पोलिसांनी बंगळूरु येथे सापळा रचून तिला ताब्यात घेत अटक केली . तिच्यासोबतच तिचा एक सहकारी मो़शेख मो़ हुसेन रा़ नागपूर यालाही अटक करण्यात आली आहे. तिच्याजवळून तब्बल ४१ लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहे.सदर कारवाई  पोलीस अधीक्षक  नियती ठाकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत  ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या मार्गदशात पोलीस उपनिरीक्षक कापडे, साहाय्यक फौजदार जाधव, नीलेश मुडे, महिला पोलीस कर्मचारी गीता,बबिता यांच्या पथकाने ही कारवाई केली.