आरोपी महिलेला बंगळूर येथून केली अटक:४१ लॅपटॉप जप्त

नागपुरातील एका फायनान्स कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून चंद्रपुरातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीस लाखाने गंडा घालणाऱ्या एका महिलेला रामनगर पोलिसांनी बंगळूर येथून अटक केली आहे.
लक्ष्मी शंकर कोरवन रा़. पिपरबोडी ता़.भद्रावती असे अटकेतील महिलेचे नाव आहे़. लक्ष्मी ही पतीपासून विभक्त राहत असून, व्यावसायीकांशी ओळख निर्माण करणे आणि ओळखीचा फायदा घेत त्याला गडविणे असा तिचा व्यवसाय होता.अशी माहिती पोलिसांनी दिली.अशाच एका ओळखीतून तिचा संपर्क चंद्रपूर येथील व्यापाऱ्याशी आला आणि तिने टाटा कॅपिटल फायनान्स नागपूर या कंपनीचे बनापट कागदपत्र तयार करून, या फायनान्समधून आपल्याला ५० लाखांचे कर्ज मंजूर झाले असून, मला तातडीच्या कामासाठी ३० लाखांची गरज आहे कर्जाची रक्कम मिळताच आपण तीस लाख परत करू असे सांगत तिने एका व्यापाऱ्याला २०१६ मध्ये तीस लाख रुपये मागितले. त्या व्यापाऱ्याने देखील ३० लाख दिले, मात्र बरेच महिने लोटल्यानंतरही तिने पैसे परत केले नाही यानंतर व्यापाऱ्याने दिलेल्या रकमेबाबत तिला विचारणा सुरू केली यावेळी ती उडवाउडवीची उत्तरे देत होती.
व्यापाऱ्याला संशय आल्याने त्याने टाटा कॅपिटल फायनान्स येथे चौकशी केल्यानंतर लक्ष्मी कोरवन या महिलेला असे कोणतेही कर्ज मंजूर झाले नाही, अशी माहिती मिळाली तर, लक्ष्मी कोरवन हिच्याकडे संबंधित कंपनीचे बनावट कागदपत्र असल्याने कंपनीने रामनगर पोलीस ठाण्यात लक्ष्मीविरुद्ध मार्च महिन्यात तक्रार दिली होती.पंरतु लक्ष्मी कोरवन ही बेंगळूरु येथे फरार झाली होती दरम्यान, लक्ष्मीच्या शोधात असलेल्या पोलिसांनी बंगळूरु येथे सापळा रचून तिला ताब्यात घेत अटक केली . तिच्यासोबतच तिचा एक सहकारी मो़शेख मो़ हुसेन रा़ नागपूर यालाही अटक करण्यात आली आहे. तिच्याजवळून तब्बल ४१ लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या मार्गदशात पोलीस उपनिरीक्षक कापडे, साहाय्यक फौजदार जाधव, नीलेश मुडे, महिला पोलीस कर्मचारी गीता,बबिता यांच्या पथकाने ही कारवाई केली.

