Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २०, २०१८

चंद्रपूरच्या त्या किल्ल्यासाठी चार दिवस चालले युद्ध

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या वैभवावर ब्रिटिशांची नजर होती. तह झाल्यानंतरही किल्ला न मिळाल्याने ब्रिटिशां नी हल्ला चढविला. चार दिवस युद्ध झाले. किल्ल्याला खिंडार पडले आणि चंद्रपूरच्या किल्ल्यावर पठाणपुरा गेटवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. या ऐतिहासिक युद्धात अनेक सरदार, सैनिक धारातीर्थ पडले होते. या युद्धाच्या संबंधातील स्मारक, समाधी अस्तित्वात असून ते या घटनेची साक्ष देतात. या घटनेला आज, रविवारी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत.   
चंद्रपूरच्या  वैभवशाली किल्ल्यावर सर्वांचीच वक्रदृष्टी होती. भोसल्याचे राज्यसुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. त्यानी १८१६मध्ये तैनाती फौजेचा तह करून स्वाक्षरी केल्या होत्या. पुढे जानेवारी १८१८च्या तहानुसार चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात द्यावा असे ठरले असतानाही तो देण्यात आला नव्हता. तेव्हा इंग्रज फौजेनी चंद्रपूरच्या किल्ल्यास ९ मे, १८१८ रोजी वेढा दिला. भोसलेच्या फौजांनीही तोफांनी प्रतिहल्ला चढविला. सलग चार दिवस हे युद्ध सुरू होते. परंतु किल्ला भक्कम आणि मजबूत असल्याने शक्य झाले नाही. १९ मे रोजी किल्ला भंगला, त्याला खिंडार पडले आणि २० मे १८१८ रोजी या खिंडारातून सैनिक शहरात आत शिरले. यावेळी भोसले राजांनीसुद्धा आपले सैनिक तयार ठेवले होते. मात्र इंग्रजांच्या रणसाहित्यापुढे इलाज चालला नाही. ब्रिटिशांचा चंद्रपूरच्या किल्ल्यावर झेंडा फडकला.
किल्लेदार गंगासिग जाटचे शौर्य
आप्पासाहेब भोसल्यांचा गंगासिंग जाट हे चंद्रपूर येथील विश्वासू किल्लेदार होते. जातीने जाट व त्यांचे आडनांव दिघ्वा होते. येथे मराठा-इंग्रज सैनिकांत तुंबळ युद्ध सुरू झाले. गंगासिह विराप्रमाणे लढून शहीद झाले. अली खान पठाण तोपची या गोलदांजाने मेजर कोरहॅम या इंग्रज अधिकार्यास मारल्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांनी सांगितले. यापैकी गंगासिह यांची समाधी जटपुरा गेटबाहेर तर मेजर कोरहॅम यांची समाधी पठाणपुरा गेटबाहेर पाटील यांच्या फुलांच्या वाडीत आजही आहे. त्यावर तत्कालीन युद्धाचा उल्लेखही आहे. 
                                      इको-प्रो चे 'हेरिटेज वॉक'
'इको-प्रो'चे चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. आज, रविवारी या अभियानास ४२५ दिवस पूर्ण होत आहेत. इंग्रजासोबतच्या युद्धास २०० वर्षे पूर्ण होत असल्याने या निमित्ताने घटनास्थळी भेट देवून इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने या सर्व स्थळावर हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बंडू धोतरे यांनी दिली.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.