Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १९, २०१८

समोर वाघोबा दिसताच घाबरल्याने दुचाकीवरून पडून बापलेक जखमी

रामटेक/हर्ष कनोजे:
समोर एकाएकी चक्क वाघेबांचे दर्शन झाल्याने व अनपेक्षित प्रसंग गुदरल्याने घाबरगंडी उडाली.यात दुचाकीस्वाराचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व त्यात तो स्वतः व त्याचा पाच वर्षीय  मुलगा दोघेही खाली पडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर त्याचा मुलाला किरकोळ दुखापत झाल्याची झाटना रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाणे हद्दीतील मौजा पिंडकापार येथे दिनांक 19 मे 2018 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली.        
              याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,सध्या जंगल भागातील गावांमध्ये तेंदू पत्ता संकलनाचे काम मोठया प्रमाणावर सुरू आहे.टेंभराच्या झाडाची पाने तोडून आणणे व एकेक पान चवडून त्याचे पुडे बांधने व गावातील पत्ताफडीवर नेवून द्यायचे असा हा व्यवसाय आहे रामटेकच्या देवलापार भागातील गावांमधील मजुरांना या उन्हाळयाच्या दिवसांत तेंदूपत्ता संकलन हा मोठा रोजगार आहे मात्र यासाठी जंगलात जावे लागते.      उपरोक्त घटनेत पुडे बांधण्यासाठी पळसाच्या झाडाची जडी आणून त्याचा वेत तयार केला जातो व त्याने पुडे बांधले जातात.अशाच प्रकारे वेत आणण्यासाठी आपल्या दुचाकीने जंगलात आपल्या मुलाला सोबत घवेून जात असतांना जंगलात पिंडकापार येथील 28 वर्षीय बिरसिंग बिरलाल कोडवते यांना एकाएकी समोर वाघ दिसल्याने त्यांची बोबडीच वळली.त्यांचे दुचाकीवरचे नियंत्रण क्षणात संपले व ते मुलासह खाली पडले.यात त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली.मुलालाही खरचटले.मात्र देवकृपेने वाघोबानेही दुसरीकडे पळ काढला व बाका प्रसंग निभावला.जखमी अवस्थेत त्यांनी देवलापारचे ग्रामीण रुग्णालय गाठले.घटनेची माहीती कळताच पवनी वनपरीक्षेत्राचे क्षेत्रपाल किशोर कैलुके व वनकर्मचारी यांनी देवलापारचा दवाखाना गाठला व माहीती घेतली.कोडवते यांची प्रकृती जास्त बिघडण्याची शक्यता वाटल्याने त्यांना नागपुरच्या मेयो ईस्पितळात रेफर करण्यात आले व  नंतर मेडीकलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली.कैलुके यांनी दिलेल्या माहीतीनुसार बिरसिंग कोडवते यांची प्रकती स्थिर असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्ह्याडे  यांनी ही मेडीकलमध्ये जावून जखमीची विचारपूस केल्याचे कळते.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.