Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २०, २०१८

चुकीच्या जागेमुळे वाढला चंद्रपूरचा ताप

संबंधित इमेजनागपूर प्रतिनिधी:
विदर्भातील इतर ठिकाणांपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने जास्त तापमान दाखविणारी चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथील तापमापक यंत्र बदलण्यात यावी अशी शिफारस केंद्रीय हवामान खात्याने केली आहे. चुकीच्या जागी यंत्र लावली असल्याने तेथे जास्त तापमान नोंदविले जाते अशी तक्रार केंद्र हवामान खात्याकडे गेली अनेक वर्षे सातत्याने केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या दोन ठिकाणचे तापमान या उन्हाळ्यात सातत्याने जास्त नोंदविण्यात येत आहे. विदर्भातील इतर ठिकाणांपेक्षा या दोन ठिकाणांवर एक ते तीन अंशांनी जास्त तापमान नोंदविले गेले आहे.नुकतेच चंद्रपूर येथे ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्याच वेळी विदर्भातील इतर ठिकाणी मात्र इतके तापमान नोंदविण्यात आले नव्हते. आणि ब्रह्मपुरी येथील तापमान यंत्रेही चुकीच्या ठिकाणी लावले असल्याची तक्रार करणारे पत्र पर्यावरण अभ्यासक आणि वने व पर्यावरण मंत्रालयाच्या रिजनल एम्पॉवर्ड कमिटीचे सदस्य सुरेश चोपणे यांनी हवामान खात्याला लिहिले होते. हे यंत्र गजबजलेल्या परिसरात आहे तसेच सिमेंट कॉन्क्रेटचे बांधकामही बरेच आहे.  ब्रम्हपुरीचे तापमान केंद्र हे तहसील कार्यालयात आहे,  चुकीच्या ठिकाणी ही यंत्रे लावली गेल्याने  तापमान जास्त नोंदविले जात असल्याचे चोपणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, हवेचे तापमान मोजतांना  ते मोकळे हवेचे मोजले जाणे आवश्यक आहे. जागतिक हवामान संघटनेच्या निकषानुसार हवामान केंद्र हे मोकळे जागी म्हणजेच गावाबाहेर असायला हवे मात्र चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी अशा दोन्ही ठिकाणी हे यंत्र बंदिस्त जागी आहे. नागपूर आणि चंद्रपूर एकाच भौगोलिक प्रदेशात असताना दोन्ही ठिकाणच्या तापमानात दोन ते तीन वर्षांचा फरक पडल्याचे शक्य नसल्याचे  म्हणणे आहे. चुकीचे तापमान जगभरात माहिती होते. त्यामुळे हवामान केंद्राची जागा बदलून दिले जावे अशी मागणी सुरू आहे.
 चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे सध्या ज्या ठिकाणी तापमापक यंत्र लावले आहे ती जागा चुकीची आहे यासंदर्भात आम्ही नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्र कळविले आहे राज्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने हवामान केंद्रासाठी नवी जागा शोधावी आणि तेथेही केंद्र हलविण्यात यावे असे केंद्रीय हवामान खात्याने म्हटले आहे सिंदेवाही येथील अग्रोमेंट  केंद्रातील सेन्सर तपासण्यात यावे आणि गरज पडल्यास बदलावे असे नागपूर प्रादेशिक केंद्राला कळविण्यात आले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे

मात्र नागपूर प्रादेशिक केंद्राला केंद्राने दिलेल्या सूचना मान्य नसल्याचे समोर आले आहे .चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी  या दोन्ही जागेचे कारण हे नागपूर प्रादेशिक हवामान खात्याला मान्य नाही आणि दोन्ही ठिकाणचे  तापमान यंत्र अगदी बरोबर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात कोणतीची चूक होत नसल्याचे त्यांचे सांगितले. 
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.