Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०५, २०१८

वळणमार्गाच्या मागणीसाठी जोरगेवार यांच्या समवेत अनेक संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जिल्ह्यातील तसेच शहरातील जनता त्रस्त झाली आहे. चंद्रपूरातील मूख्य समस्यांपैकी एक समस्या असलेल्या जटपुरागेटच्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांना या मार्गावरुन वाहणे चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) जिल्हासामान्य रुग्णालय तसेच ईतर खाजगी रुग्णालये असल्याने रुग्णवाहीकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्या एवजी आता येथे नवीनच सौदर्यीकरन करण्याचे नियोजन करून काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी २.५० कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात येणार असून जटपूरा गेटवर थिम लायटींक लावण्यात येणार आहे. मात्र या सौंदर्यीकरणामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही तर अधिक जटीत होणार आहे.
म्हणून या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत जटपुरा गेटवर होत असलेली वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यासंदर्भात जिल्ह्यतील अनेक संघटनांना जोरगेवार यांनी एकत्रित करून आज जिल्हाधिकारी यांना निवेदनासह आराखडा देण्यात आले. यात संपूर्ण सामाजिक संघटनांनी या आराखड्याप्रमाणे फक्त १ महिन्यासाठी प्रायोजिक तत्वावर वळण मार्ग करण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाची दाखल घेत चार लोकांची समिती गठीत केली त्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, शहर अभियंता मनपा तसेच उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ यांची समिती गाठीत करण्यात आली असे यावेळी सांगण्यात आले व येत्या २ दिवसात या विषयावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सिटीजन फारम चे अध्यक्ष रमणिक चव्हाण, सदानंद खत्री, जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड.रमेश टिपले, जे.सी.आय. चे अध्यक्ष प्रशांत जाजू, ऑटो संघटनेचे अध्यक्ष बळीराम शिंदे, पतंजली सेवा समितीचे अध्यक्ष अनिल दिकोंडवार, विध्यार्थी व बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विशाल साव, दीपक दापके, अजय जैस्वाल, दिलीप कपूर, दीपक पद्म्गीरीवार, विनोद अनंतवार, विनोद गोल्लजवार यांच्यासह अनेक संघटनाचे कार्यकर्ते पाधाधीकारी व सामजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.