Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०५, २०१८

अपघातात ‘रानगव्याचा मृत्यु

चंद्रपूरः वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने पद्मापूर-मोहर्ली या वनक्षेत्रातुन ताडोबा साठी जाणाÚया रोड वर ठिकठिकाणी ब्रेकर्स तयार करण्याची मागणीइको-प्रो संस्थेच्या वन्यजीव विभागाचे विभाग प्रमुख नितीन बुरडकर यांनी केलेली आहे.

आज सकाळी मोहर्ली रोड रानगवा मृत अवस्थेत आढळला, त्याचा रोड अपघातात मृत्यु झालेला आहे. सदर रोड हा वनक्षेत्रातुन जात असल्याने या रस्त्यावर ब्रेकर्स ची अत्यंत गरज असल्याने इको-प्रो तर्फे ताडोबा व्यवस्थापनास निवेदन देउन मागणी करण्यात आलेली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जगविख्यात झालेला आहे. कोर झोन सोबतच बफर झोन मध्येही पर्यटन सुरू झालेले आहे. बफर झोन मधे सुध्दा पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. याव्यतीरिक्त मोहर्ली वनक्षेत्रात बोटीग, बटरफलाय गार्डन आदी पर्यटकांना आकर्षण निर्माण झालेले आहे, यामुळे या भागात पर्यटकांची वाहनासह ये-जा सतत सुरू असते. तसेच बफर झोन अंतर्गत येणाÚया पद्मापूर ते मोहर्ली या रोडचे बांधकाम झाल्याने या रस्त्याने होणारी वाहतुक सुध्दा वाढलेली आहे. सदर रस्ता चांगला असल्याने या रस्ताने जाणारी वाहनांची गती सुध्दा अधीक असते. त्यामुळे नेहमीच वन्यप्राण्यांकडुन रस्ता ओंलाडतांना अपघाताचा धोका असतो. संदर्भीय घटनेनुसार आणी यापुर्वी सुध्दा या रोडवर वन्यप्राण्यांचे अपघात झालेले आहेत. वन्यप्राण्यांसोबत मनुष्यांना सुध्दा अपघातात जख्मी व्हावे लागले आहे.

सदर पद्मापुर ते मोहर्ली हा रस्ता वन्यप्राण्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असुन यापुढील घटना टाळण्याच्या दृष्टीने त्वरीत कार्यवाही अपेक्षीत आहे. तसेच पर्यटकांच्या वाहनांची गती नियत्रीत राहावी यावर उपाय म्हणुन या रोडवर ठिक-ठिकाणी ब्रेकर्स, रंबल स्ट्रिप तयार करण्याची गरज आहे. इको-प्रो संस्थेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की सदर ब्रेकर्स लवकरात लवकर लावण्यात यावे. तसेच पद्मापुर गेटवरील सिसिटीवी कॅमेरा पुर्वव्रत सुरू करण्यात यावे याकरीता आज इको-प्रो च्या वन्यजीव विभागातर्फे ताडोबाचे क्षेत्रसंचालक मुकुल त्रिवेदीआणी बफरचे उपसंचालक गजेंद्र नरवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नितीन बुरडकर, प्रमुख, इको-प्रो वन्यजीव विभाग, अमोल उटट्लवार व रोशन धोतरे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.