Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०७, २०१८

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा धडकली जिल्हाधिकार्यालयावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली आहे.
सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. राजुरा वरून निघालेली हि पदयात्रा बल्लारशा मार्गे होत जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकली व धरणे आंदोलन करण्यात आले.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.