Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ०१, २०१८

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छता अभियानास 1 वर्ष पुर्ण

                                                  मागील वर्षभरात कार्यकर्त्यांचे 348 दिवस श्रमदान
चंद्रपूर प्रतिनिधी:
 इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन किल्ला-परकोट स्वच्छता अभियानास आज 1 वर्ष पुर्ण झालेले आहे. यानिमीत्त आज एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 `
चंद्रपूर शहर ऐतीहासीक गोंडकालीन किल्ला, समाध्या व मंदीरे साठी ओळखला जातो. या शहरात जवळपास 500 वर्ष जुना गोंडकालीन किल्ला-परकोट असुन आजही भक्कम स्थितीत उभा आहे. या परकोटाची लांबी जवळपास 11 किमी लांब असुन 4 दरवाजे 5 खिडक्या आणी 39 बुरूजे आहेत. याकडे बरीच वर्ष दुर्लक्ष झाल्याने यावर मोठी-मोठी झाडे, वृक्ष-वेली, झाडी-झुडपे वाढल्याने याला खंडहर स्वरूप प्राप्त झालेले होते. संपुर्ण परकोटावर अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. हा संपुर्ण किल्ला-परकोट स्वच्छ व साफ करण्याच्या दृष्टीने 1 मार्च 2017 रोजी इको-प्रो संस्थेच्या कार्यकत्र्यानी चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानाची सुरूवात केली होती. आज 1 मार्च 2018 रोजी या अभियानास एक वर्ष पुर्ण झाले असुन या वर्षभरात एकुण 348 दिवस प्रत्यक्ष श्रमदान करून किल्ला स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे.
किल्ला स्वच्छता अभियानास एक वर्ष पुर्ण झाल्याचे निमीत्त साधुन आज किल्ला-परकोटावरील विठोबा खिडकी ते बिनबा गेट मधील बुरूज क्रं. 25 वर आज छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. यात प्रमुख उपस्थिती शहरातील जेष्ठ इतीहास अभ्यासक आचार्य टी टी जुलमे उपस्थिती होती. सोबत इको-प्रो चे बंडु धोतरे, प्रा डाॅ योगेश दुधपचारे, प्रा डाॅ मिलींद जांभुळकर, संदीप जेउरकर, रवी झाडे, धनजंय शास्त्रकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अभियानास 1 वर्ष पुर्ण झाल्याचे निमीत्ताने यावेळी केक कापण्यात आला. यांनतर उपस्थित पाहुणे आणी जनता महाविदयालयाचे विदयाथ्र्याना किल्लाचा परीसराची फेरी म्हणजेच ‘हेरीटेज वाॅक’ करवुन किल्लाची माहीती देण्यात आली. या अभियान अंतर्गत कशा पध्दतीने श्रमदान करून स्वच्छता राबविण्यात आली याची माहीती देण्यात आली. इको-प्रोच्या अनेक कार्यकत्र्याच्या सातत्यपुर्ण योगदानामुळे सदर अभियान यशस्वी होत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली.
सदर अभियान आता फक्त किल्ला स्वच्छतेकरीता मर्यादीत न राहता यापुढे या अभियानाचे स्वरूप चंद्रपूर शहरातील पर्यटन विकास व सुंदर चंद्रपूर च्या दृष्टीने सुध्दा महत्व वाढलेले आहे. या अभियानात स्थानीक नागरीक, प्रशासन व शासनाचे सहकार्य सुध्दा प्राप्त होत आहे. पुरातत्व विभाग कडुन या किल्लास दोन्ही बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यामुळे किल्ला व संरक्षण भिंत यामधुन पाथ वे, सायकल ट्रॅक करीता विकसीत करण्यात यावा याकरीता संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गोंडराजे समाधीस्थळ येथे लाईट व साॅउड च्या माध्यमातुन गोंड राज्यांचा गौरवपुर्ण इतीहास नागरीकांसमोर यावे याकरीता प्रयत्न सुरू आहेत. एकदंरीत स्वच्छता अभियान पुढे-पुढे शहराच्या एकंदरीत सौदर्यात कशी भर पडेल यादिशेने प्रयत्न सुरू असुन सर्व नागरीकांनी सुध्दा यापुढे किल्ला स्वच्छ-सुंदर राहीला पाहीजे याकरीता प्रयत्नशील असण्याची गरज आहे. याकरीता किल्ला परीसरात ठिक-ठिकाणी जनजागृती सुध्दा केली जात आहे.

आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इको-प्रो चे रविद्र गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अनिल अडगुरवार, राजु काहीलकर, संजय सब्बनवार, अमोल उटट्लवार, सुधीर देव, हरीदास कोराम, किशोर वैदय, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे, विनोद दुधनकर, सुमीत कोहळे, आशीष मस्के, विशाल रामेडवार, प्रतीक बदद्लवार, सचिन धोतरे, हेमंत बुरडकर, कपील चौधरी आदीनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.