Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ०१, २०१८

संस्थेमुळे मी आहे, हि भावना कर्मचाऱ्यांमध्ये रुजायला हवी... विनोद बोंदरे

कोराडी (नागपूर):
 नवनवीन तंत्रज्ञान व वीज उत्पादनातील कठोर निकष यामुळे वीज क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धेत  वाढ, बदल झपाट्याने होताना दिसतात. महानिर्मितीच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान वाढविण्याची खरी गरज आहे, आपले दैनंदिन काम, प्रत्येकाने नियोजित वेळेत चोख बजावले पाहिजे, महानिर्मितीमुळे मी आहे, हि भावना प्रत्येकाच्या मनात रुजायला हवी असे मत विनोद बोंदरे यांनी व्यक्त केले. ते महानिर्मितीतर्फे कोराडी प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित  दोन दिवसीय ८ व्या राज्यस्तरीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेच्या उदघाटन समारंभात बोलत होते.  
                 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता(प्रशिक्षण) सुनील आसमवार तर प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे, मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, विशेष अतिथी म्हणून  सुप्रसिद्ध वक्ते सुमंत टेकाडे, अधीक्षक अभियंता आनंद मेश्राम, कार्यकारी अभियंता विनय हरदास, जितेंद्र टेंभरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 
सुमंत टेकाडे म्हणाले कि, गुणवत्ता हा स्वभाव आहे, स्वत:मध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, ध्यास घेता आला पाहिजे. जीवनाचे ध्येय निश्चित करून सिस्टम आधारित काम कसे करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि  सूक्ष्म गुणवत्ता कौशल्य यावर त्यांनी उत्तम उदाहरणासह तपशीलवार विवेचन केले. यानंतर,राजकुमार तासकर यांनी समयोचित भाषण केले. अध्यक्षीय भाषणातून सुनील आसमवार म्हणाले कि, प्रत्येक यंत्राच्या मागे असलेला माणूस हा महत्वाचा असला तरी वीज उत्पादन मूल्य कमी ठेवण्यासाठी आवश्यक बाबींवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी गुणवत्ता मंडळांनी पुढाकार घ्यावा व महानिर्मितीच्या शाश्वत विकासात योगदान वाढवावे असे त्यांनी स्पर्धकांना आवाहन केले. 
                    महानिर्मितीच्या औष्णिक, जल, वायू वीज केंद्र जसे चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ,उरण, पोफळी, मुख्यालय मुंबई अश्या राज्यभरातील ३६ गुणवत्ता मंडळांच्या १८८ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून संगणकीय सादरीकरण, प्रतिकृती(मॉडेल), निबंध स्पर्धा, ज्ञान चाचणी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंच स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. 
                             प्रास्ताविकातून  आनंद मेश्राम यांनी महानिर्मितीच्या गुणवत्ता मंडळ चळवळीचा आढावा घेतला व महत्व सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मिलिंद रहाटगावकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीपाद पाठक यांनी केले. संजय राचलवार, जी.मुरली, संजय कुलकर्णी, डॉ.विश्वास देशपांडे स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. उदघाटन समारंभास अधीक्षक अभियंता श्याम राठोड,उप महाव्यवस्थापक(मासं) लता संख्ये, संकेत शिंदे,सहाय्यक महाव्यवस्थापक प्रकाश प्रभावत, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, कोराडी प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ.किशोर सगणे,अधिकारी,अभियंते,स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.