Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २५, २०१८

अखेर त्या वाघाचा मृत्यू

चंद्रपूर (ललित लांजेवार) :
गेल्या चार दिवसांपासून  चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिट कक्ष क्रमांक ५ मधील जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अखेर मृत्यू झाला.

हा वाघ मागील चार दिवसांपासून गाव तलावा शेजारी बसला होता,  त्याच्या  डोक्यावर व उजव्या पायाला जखमा असल्याचे आढळून आले होते,त्यामुळे अश्या जखमी वाघाची प्रकृती अतिशयखालावत असतानाही  वनविभागाकडून त्याच्यावर उपचार केला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून २० किमी अंतरावरील भान्सुलीच्या जंगलात हा वाघ जखमी अवस्थेत होता. गुरूवारी वनाधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रपिंगच्या माध्यमातून  त्याच्या हालचाली टिपल्या गेल्या होत्या या जखमी वाघाची संपूर्ण माहिती  मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडे पाठविण्यात आले होते. हा वाघ दोन वाघाच्या जखमी झाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले होते,वाघावर उपचार करण्यासाठी वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांच्याकडे  करण्यात आली होती मात्र चार दिवस लोटले तरीही वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याने वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहायक उप वनसंरक्षक आर.एम.वाकडे, वन्यजीवप्रेमी अमोद गौरकार यांनी जखमी वाघाची पाहणी केली. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा ठेवला . मागील चार दिवसांपासून वाघाने काही खाल्ले नसल्याने तो अशक्त झाला होता. लवकर उपचार न झाल्यास वाघाचा मृत्यु होण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींकडून वर्तविली जात आहे. वाघ जखमी असल्याने त्याला शिकार करणे शक्य नव्हते,त्यामुळे तो गेल्या ४ दिवसांपासून उपाशी होता, त्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
या आधी चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे शेतशिवारात शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यामुळे ८ नोव्हेंबर  २०१७ ला  वाघाचा मृत्यू झाला होता.  गेल्या काही दिवसा अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती.याच घटने पासून तब्बल १०  दिवसातच तेथून जवळच असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वारंवार होत असलेल्या वाघांचा मृत्यू वनविभागाच्या चांगलाच जिव्हारी लागू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पर्यटकांना दिल खुलास दर्शन देऊन पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्याच वाघांचे एक-एक करून होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.असा सुर येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांन कडून ऐकायला मिळत आहे. मागील काही वर्षात वाघ दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत याठिकाणी बरीच वाढ झाली होती. यानिमित्तानं वाढता पर्यटकांचा ओघ पाहता वन विभागाने प्रवेश शुल्क आदीत ही दुपटीने वाढ केली होती. अश्यातच दिवसेंदिवस वाघांचा एकापाठोपाठ अरे मृत्यू चिंतेची बाब आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.