Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मृत्यू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मृत्यू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ऑक्टोबर ०९, २०१८

 चंद्रपूर-उमरेड-नागपूर मार्गावर भीषण अपघात

चंद्रपूर-उमरेड-नागपूर मार्गावर भीषण अपघात

उमरेड जवळ उदासा येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि 
ट्रकमध्ये भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू 

नागपूर ते सिंदेवाही जात असतांना उमरेड तालुक्यातील उदासा शिवारातील घटना 

ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला  जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू 

 झाला तर चार गंभीर जखमी 
  व उमरेड ग्रामीण रुग्णालयात ३० प्रवाश्यांवर उपचार सुरू आहे 

आज मंगळवारी रात्री ८  वाजताची घटना 

राहुल ट्रॅव्हल्सचा अपघात

उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रक चाक पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली.  


उमरेड मार्गावरील उदासा शिवारात मंगळवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान ट्रॅव्हल्स उभ्या टिप्परवर धडकली. यात पाच ठार तर दहा प्रवासी जखमी झाले.नागपूरवरून वडसा येथे जाण्यासाठी राहुल ट्रॅव्हल्सची एमएच ३४-ए-८४७५ या क्रमांकाची बस सायंकाळच्या सुमारास निघाली. उदासा शिवारात येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या एमएच-४०-एके-२३४४ क्रमांकाच्या गिट्टी भरलेल्या टिप्परवर धडकली. बसचा समोरील भाग चक्काचूर होऊन पाच प्रवासी जागीच ठार झाले. जखमी जिवाच्या आकांताने मदतीसाठी धावा करीत होते. या मार्गावरून जाणारे प्रवासी आणि गावकरी धावून आले. जखमींना तातडीने उमरेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलिवण्यात आले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या जमावाने टिप्पर पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
5 Died in Travel and Tipper Major Accident o Nagpur Umred Highwayमृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये लक्ष्मीकांत वामन लोढे (२९, रा. रत्नापूर), गीता के. झोडे (३५, रा. मकरधोकडा), विनोद मारोती ढोक (३७, रा. रत्नापूर), रागिनी व्ही. चहांदे (१९, रा. तुकूम), सुनील एस. डेकाटे (४५, रा. रत्नापूर), परसराम जे. पराते (४०, रा. भिवापूर), शैलेश बी. विजयकर, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, राहुल एस. तायडे (२६, रा. सिंदेवाही), शुभांगी देवीदास राऊत (२४, रा. तुकूम), आकाश ठवकर (२६), लक्ष्मण चहांदे (३०), जयप्रकाश सायरे (३५, रा. कामठी), चंद्रा तिकारे (२५, रा. अंतरगाव), गायत्री तिकारे (२३, रा. अंतरगाव), अमर मांढरे (६५, रा. सावरगाव), प्रियंका बनवारे (२३, रा. रमावा) यांच्यासह अन्य तिघांचा समावेश असल्याचे समजते आहे.                                           

नागपुर वरून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही 

तालुक्यातील नवरगाव येथे जात होती ट्रॅव्हल्स


स्रोत:abp 



-----------------------------------------------------
kavyshilp partner 
advertisement


नागपुरात ट्रेलर ट्रकने महिलेला चिरडले

नागपुरात ट्रेलर ट्रकने महिलेला चिरडले

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
चौदामैल चौक टि पाँईट परिसरातील घटना
तात्काळ गतिरोधक (ब्रेकर) लावण्याची स्थानिकांची मागणी
बाजारगाव/प्रतिनिधी:
 येथून जवळच असलेल्या कळमेश्वर पोलीस स्टेशन ठाणा हद्दितील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चौदामैल चौक कळमेश्वर वळण रस्त्यावर ट्रेलर ट्रक वळण घेत असता फळ विक्रेत्या महीलेचे रस्ता ओलांडत असतांनी ट्रेलर ट्रकखाली येऊन काळाने झडप घेतली.
सविस्तर वृत्त प्राप्त माहिती नुसार नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मंगळवार (९/आॕक्टोंबर) सकाळी ९.०० वा. दरम्यान चौदामैल चौक परिसरात फळ विक्रेता महिलेचे छोटेसे दुकान असून ती रोडच्या पलीकडे जाऊन आपल्या दुकानात नास्ता घेऊन वापसी परतीला महामार्ग रस्ता ओलांडत असतांनी नागपूरवरुन अमरावती ला भरधाव वेगात अज्ञात आयसर ट्रक जात असता.. महिला अर्ध्या मार्गावर (मधल्या रस्त्यावर) उभी होती. त्याचवेळी कळमेश्वर वळण मार्गाने येत असलेला ट्रेलर ट्रक आरजे १९ जिई २७०२ क्रमांकाचा नागपूर दिशेने वळण घेतेवेळी भरधाव जात असलेला अज्ञात आयसरने उभ्या असलेल्या महिलेला कट दिला व ट्रेलर ट्रक ला धडक देऊन सरळ महामार्गानी पसार झाला. त्याचवेळी महिला संकटात सापडल्याने ती घाबरून मागे सरली तर काय चक्क ट्रेलर ट्रकखाली आल्यानी तिच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्यानी दुर्गा शेरसिंग ठाकरे (३५) राहणार वार्ड क्रमांक पाच साईमंदीर जवळ गोंडखैरी हिचा जागिच मृत्यू झाला. व बघ्याची गर्दी वाढली.
घटनेची माहीती तिचा पती शेरसिंग ला मिळताच मृतक महिलेचे दोन लहान मुले (एक सात वर्षाचा तर दुसरा बारा वर्षाचा) घटनास्थळावर येऊन आई-आई बोलून रडू लागले.
तात्काळ घटनेची माहिती शेख कैश यांनी कळमेश्वर पोलीसांना दिली. व कळमेश्वर पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन तसेच खुर्सापार वाहतुक पोलीस मदत केंद्रातील साहयक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश हिवरकरसह अन्य वाहतुक पोलीसकर्मी दाखल होऊन बघ्याच्या गर्दीला आवरुन ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग सुरळीत करण्यात आला. व पंचनामा करुन मृतक महिलेला उत्तरीय तपासणी करीता कळमेश्वरचे ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात आयसर ट्रकच्या तपासाला सुरवात करुन ट्रेलर ट्रक ताब्यात घेण्यात आला.
पुढील तपास कळमेश्वरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या नेतृत्वात पिएसआय अमोल सांगळे, सुशिल धोपटे, एएसआय राजेंद्र यादव, हेडकाँस्टेबल भोजराज तांदुळकर, अतूल खोडनकर, ललीत उईके पुढील तपास करीत आहे.
 स्थानिकांची गतिरोधकाची मागणी
वारंवार मे. अटलांटा टोल कंपनीला गतिरोधकाबद्दल लेखी तक्रारी देऊनही अटलांटा प्रशासन कोणतीही दखल घेत नाही.या परिसरात वारंवार अपघात होत असतात. गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वेग कमी होत नसून नेहमीच अपघात होत असतात. चौदामैल परिसरात ताबडतोब गतिरोधक लावण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी जोर धरु लागली.

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

बिबिट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे.जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुरपार येथील एका ८ वर्षाचा मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.मात्र हि घटना काही वेगळ्या कारणाने घडल्याचे समोर येत आहे.साहिल सालोरकर वय 8 वर्षे असे बिबट्याने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे.हा मुलगा सकाळी आई पाठोपाठ उघड्यावर शौचालयाला गेला असता त्याचेवर दबा घरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.बिबट्याने झडप घातली व त्याला खेचत जंगलात नेले. आरडाओरडा केल्या नंतर संपूर्ण गाव गोळा झाला व जंगलात साहिल चा शोध घेतला असता तो मृत अवस्थेत आढळून आला. 
महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
घडलेल्या या प्रकारावरून शासनाच्या योजना घराघरात कितपत पोहोचल्या आहेत याचा प्रत्यय समोर येत आहे.

मंगळवार, सप्टेंबर ०४, २०१८

नागपुरात शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

नागपुरात शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

नागपूर:
दारुड्या नवऱ्यानेच केली पत्नीची हत्या 

चंद्रकला राज यादव (वय ३८) असे मृत पत्नीचे नाव

दारू पिऊन पत्नीला रॉडने केली जबर मारहाण

पत्नीचा मृत्यू झाल्याबरोबर शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत पोत्यात गुंडाळून फेकला मृतदेह

आरोपी राज यादव (वय ४०) सीताबर्डी पोलिसांनी केली अटक



सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८

 मुरमाच्या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

मुरमाच्या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

प्रतिनिधी/नेरी:
नेरीवरून जवळ असलेल्या पांढरवानी येथील करण बाबुराव जांभूळे वय 14 वर्षें या मुलाचा मुरमाच्या खड्ड्यात पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारला शाळेला सुट्टी असल्यामुळे करण हा आजोबा सोबत शेतावर गेला काही वेळ आजोबा सोबत राहून दुपारच्या सुमारास शौचास लागली म्हणून आजोबाला सांगून शौचास गेला असता शिरपूर नेरी रोडजवळील मुरमच्या मोठ्या खड्ड्यात पाण्यासाठी गेला असता पाय घसरून तो सरळ पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही तो परत आला नाही म्हणून आजोबाने इकडे टिकते शोधले परंतु तो मिळाला नाही शेवटी त्याच्या आई वडिलांना सांगून सायंकाळ पर्यंत शोध मोहीम केली परंतु तो मिळाला नाही शेवटी शेतशिवरतील मुरमच्या खड्ड्याजवळ त्याची चप्पल आणि लोटा आढळून आला. त्यामुळे त्या खड्ड्यात पडला असावा असा अंदाज बांधून शोध घेतला असता त्याचे प्रेत मिळाले हा मुलगा नेरी येथील कन्या विद्यालय येथे ८  व्या वर्गात शिकत होता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस ताफ्या सहित घटनास्थळ गाठत तपास सुरु केला वृत्त लिहेपर्यंत प्रेत घटनास्थळी होते व त्यांची चौकशी सुरू होती.