नेरीवरून जवळ असलेल्या पांढरवानी येथील करण बाबुराव जांभूळे वय 14 वर्षें या मुलाचा मुरमाच्या खड्ड्यात पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारला शाळेला सुट्टी असल्यामुळे करण हा आजोबा सोबत शेतावर गेला काही वेळ आजोबा सोबत राहून दुपारच्या सुमारास शौचास लागली म्हणून आजोबाला सांगून शौचास गेला असता शिरपूर नेरी रोडजवळील मुरमच्या मोठ्या खड्ड्यात पाण्यासाठी गेला असता पाय घसरून तो सरळ पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही तो परत आला नाही म्हणून आजोबाने इकडे टिकते शोधले परंतु तो मिळाला नाही शेवटी त्याच्या आई वडिलांना सांगून सायंकाळ पर्यंत शोध मोहीम केली परंतु तो मिळाला नाही शेवटी शेतशिवरतील मुरमच्या खड्ड्याजवळ त्याची चप्पल आणि लोटा आढळून आला. त्यामुळे त्या खड्ड्यात पडला असावा असा अंदाज बांधून शोध घेतला असता त्याचे प्रेत मिळाले हा मुलगा नेरी येथील कन्या विद्यालय येथे ८ व्या वर्गात शिकत होता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस ताफ्या सहित घटनास्थळ गाठत तपास सुरु केला वृत्त लिहेपर्यंत प्रेत घटनास्थळी होते व त्यांची चौकशी सुरू होती.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments