जटपूरा गेटची वाहतुक कोंडीची समस्या मार्गी काढा नंतर सौंदर्यीकरण करा
चंद्रपूर/ललित लांजेवार: जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जनता त्रस्त असली तरी येथील लोकप्रतिनीधींना गेटच्या सौंदर्यीकरणाचे वेड लागले आहे. त्यामूळे जनतेमध्ये रोष असून या विरोधातशिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या वतीने उद्या सोमवारी जटपूरा गेट येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
चंद्रपूरातील मूख्य समस्यांपैकी एक समस्या असलेल्या जटपुरागेटच्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांना या मार्गावरुन वाहणे चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) जिल्हासामान्य रुग्णालय तसेच ईतर खाजगी रुग्णालये असल्याने रुग्णवाहीकांनाही या वाहतूक कोंडीचा फटका जाणवत आहे. परिनामी या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी तासंनतास वाहणांना रेंगाळत कासवगतीने चालावे लागत असल्याने अतिरिक्त इंधन खर्च होत असून प्रदुषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे असतांनाही या प्रश्नाकडे शासन-प्रशासनाचे जानीवपुर्ण दुर्लक्ष होत आहे. ही समस्या सोडविण्या एवजी आता येथे सौदर्यीकरन करण्याचे नियोजन शुन्य वेळ सत्ताधा-यांना लागले आहे. त्यासाठी २.५० कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात येणार असून जटपूरा गेटवर थिम लायटींक लावण्यात येणार आहे.
मात्र या सौंदर्यीकरणामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून पहिले वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा अशी मागणी करत या सौदर्यीकरणाला विरोध करत उदया सोमवारी जटपूरा गेट येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी २ वाजता होणार असून या आंदोलनाला शिवसैनिकांनी तसेच जनतेनी मोठयात-मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना चंद्रपूर शहराच्या वतीने करण्यात आले आहे.