Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

वेकोलीच्या सुरक्षा सप्ताह दरम्यान कामगाराचा मृत्यू

सिल्लेवाडा कोळसा खानीतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर 
खापरखेडा/प्रतिनिधी:
wcl mine साठी इमेज परिणामपरिसरातील  सिल्लेवाडा वेकोली कोळसा खान  परिसरात सुरक्षा सप्ताह सुरु असताना स्वच्छतेचे काम करीत असलेला एका वेकोली कर्मचाऱ्याचा रुग्णालयात कर्तव्यावर डॉक्टर गैरहजर असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे शनिवारी  दुपारच्या सुमारास मृत्यु झाला त्यामुळे वेकोली कर्मचाऱ्याची सुरक्षा ऐरनीवर आली असून दोषी अधिकारी व डॉक्टर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरु लागली आहे

सदर मृतकाचे नाव नामदेव मंगरु असे असून ते सिल्लेवाड़ा कोळसा खानीत कर्तव्यावर होते वेकोली प्रशासनाने सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारच्या सुमारास मृतक नामदेव आपल्या सहकाऱ्या सोबत स्वच्छ्तेचे करीत होते यादरम्यान मृतक नामदेवच्या पोटात व छातीत दुःखायला सुरुवात झाली त्यांना वेदना असह्य होत असल्यामुळे सहकारी कर्माचाऱ्यानी सिल्लेवाड़ा येथील वेकोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र वेळेवर एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते त्यामुळे तेथील परिचारिका व कम्पाउडरने तात्पुरते प्राथमिक उपचार केले मात्र मृतक नामदेवची प्रकुर्ती खालावत असताना त्यांना वलनी येथील वेकोलीच्या रूग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच मृत्यु झाला यासंदर्भात खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करुण पुढील तपास सुरु केला आहे .

नामदेवच्या मृत्युला वेकोली प्रशासन जबाबदार
मृतक नामदेव सिल्लेवाड़ा कोळसा खानीत कर्तव्यावर होता त्यांच्या सेवा निवृत्तीला एका वर्षाचा कार्यकाळ शिल्लक होता नामदेवने आपले संपूर्ण आयुष्य वेकोली साठी खर्ची घातले मात्र वेकोली प्रशासनाचे नियोजन शून्य असल्यामुळे त्यांना आपला जिव गमवावा  सिल्लेवाडा कोळसा खानीत शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्या उपचारासाठी रुग्णालय आहे याठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ति करण्यात आले याच अधिकाऱ्यावर चनकापुर येथील रुग्नालयाची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र घटनेच्या दिवशी ते कर्तव्यावर नव्हते फ़क्त रुग्णालयात परिचारिका व कम्पाउंडर उपस्थित होते घटनेच्या दिवशी वेळेवर वैद्यकीय अधिकारी  हजर असते तर कदाचित  नामदेवचा जिव वाचू शकला असता कर्मचारी वर्गात चर्चा आहे.
मृतक नामदेव मंगरू यांच्यावर सिल्लेवाड़ा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांची प्रकृती अधिक खालावल्या मुळे वेकोलीच्या  रुग्नवाहिकेत वलनी रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला यावेळी कोणताही कर्मचारी व अधिकारी सोबतीला नव्हता सामाजिक कार्यकर्त्ता अनिल तंबाखे यांनी या सर्व प्रकरणात समंधित अधिकारी दोषी असून त्यांच्या वर चौकशी करुण कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.