Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

खापा (नरसाळा )येथिल वेस्ट जाॅन कंपनित कामगाराचा मूत्यु.

सावनेर/प्रतिनिधी:
केळवद पासुन सहा की.मी अंतरावरील नव्याने बांधण्यात येत असलेली स्ट्रिटलाईट डिवायडर पोल बननार्‍या वेस्ट जाॅन कपंनित ता.२६ला सांयकाळी कंपनिच्या मुख्य लोखंडी  प्रवेशद्वाराचे काम करीत असतांना अचानक लोखंडी प्रवेश द्वार कामगार भुजंग गोविदां कुभरे (वय ४५वर्षे)रा.जलालखेडा यांच्या अंगावर पडल्याने,भुजंग यात गंभीर जख्मी झाला .उपचारासाठी सावनेरच्या खाजगी दवाखाण्यात नेण्यात आले.
                      प्रकुति अधिक गंभीर असल्याने,पुढिल उपचारासाठी मेडीकल नागपुर येथे हलविण्यात आले.मेडीकला उपचारा दरम्यान ता.२७ला पहाटे तिन वाजता कामगार भुजंग कुभंरे याला मूत घोषित केले.मूतकाच्या नातेवाईकानी केळवद पोलिस स्टेशन गाठुन कंपनि प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल करत जो पर्यंत मूतकाच्या कुटुबांला आर्थिक मदत मिळत नाही तो पर्यंत मूतदेह कंपनि समोरुन हटवणार नाही .
                     अशी धमकी गावकर्‍यांनी दिल्याने,केळवद चे ठाणेदार सजंय खोकले ,कंपनी मालक कोपराम सनोटीया ,सावनेर तालुका काॅग्रेस अध्यक्ष सतिश लेकुरवाळे ,सरपंच गुणवंत काळे,गोविदां ठाकरे ,बातमीदार महेद्रं बुरुलवार ,अशोक डाहाके,तसेच मूतकाचा भाऊ,दोन मुले,एक मुलगी यांच्या पुढाकाराने मध्यस्थी करत मूतकाच्या मुलीला तिन लाख ,दोन मुलांना प्रत्येकी दिड लाख रुपये कंपनी मालकाने ,चेकद्वारे देवुन दोन्ही मुलांना नोकरी देण्याचे आश्ववाशन दिल्यानंतर ,मूतदेह अंतिमसंस्कारासाठी नेण्यात आला .यावेळी कंपनी समोर केळवद पोलीसांचा कडक बदोबंस्त होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.